
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने भारतात ‘फ्रेंड मॅप’ नावाचे नवे फीचर लॉन्च केले आहे. हे फीचर मित्रांसोबत रिअल टाइम लोकेशन शेअर करून भेटीगाठी नियोजित करण्यास आणि नवीन हँगआउट स्पॉट्स शोधण्यास मदत करते. स्नॅपचॅटच्या स्नॅप मॅपसारखे हे फीचर मित्रांना एकमेकांच्या ठिकाणांची माहिती देण्यासाठी डिझाइन केले आहे. मात्र यासोबतच गोपनीयता आणि सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहेत.