Instagram New Feature : इंस्टाग्राममध्ये आलं गेमचेंजर फीचर! आत्ताच बघून घ्या हे नवीन अपडेट

Instagram trial reels feature : इंस्टाग्रामने आपल्या आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन आणि उपयुक्त फिचर आणले आहे.
Instagram new feature
Instagram trial reels featureesakal
Updated on

Instagram Latest Update : इंस्टाग्रामने आपल्या क्रिएटरसाठी एक नवीन आणि उपयुक्त फिचर आणले आहे. हे फीचर आहे ट्रायल रील्स. या सुविधेमुळे आता क्रिएटर्स त्यांच्या व्हिडिओंची चाचणी नॉन-फॉलोअर्सकडे सहज करू शकतील. ही सुविधा विशेषतः अशा क्रिएटरसाठी उपयुक्त ठरेल, जे आपल्या फॉलोअर्सच्या प्रतिक्रियांमुळे नव्या शैलीचे प्रयोग करण्यास संकोच करतात.

काय आहे ट्रायल रील्स?

ट्रायल रील्स ही एक विशेष सुविधा आहे, जे क्रिएटर्स आपले व्हिडिओ मुख्य प्रोफाइलवर न दाखवता केवळ नॉन-फॉलोअर्सपर्यंत पोहोचवू शकतात. क्रिएटर आपल्या व्हिडिओवर ट्रायल पर्याय निवडून हा प्रयोग करू शकतात.

क्रिएटर्सना नवीन शैली, विषय किंवा फॉर्मॅटची चाचणी करण्याची संधी मिळते. फॉलोअर्सच्या टीकेची किंवा ट्रॉलिंगची चिंता कमी होते. नॉन-फॉलोअर्सकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांच्या आधारे फॉलोअर्स वाढविण्याची संधी मिळते.

Instagram new feature
Top Startups in India : झेप्टोपासून जारपर्यंत, २०२४ मध्ये 'या' १० स्टार्टअप्सनी घेतली गगनभरारी

रील्सचे प्रदर्शन कसे होईल?

ट्रायल रील्स क्रिएटरच्या मुख्य प्रोफाइलवर दिसणार नाहीत. मात्र, त्या अन्यत्र (जसे Explore पेज) फॉलोअर्सना दिसू शकतात. 24 तासांनंतर क्रिएटर या व्हिडिओवर आलेल्या प्रेक्षकसंख्या, लाईक्स, शेअर्स, आणि कमेंट्स याचा तपशील पाहू शकतील.

आणखी नव्या वैशिष्ट्यांचा समावेश

इंस्टाग्रामने याशिवाय काही रोमांचक बदल केले आहेत. मित्रांसोबत रिअल टाइममध्ये लोकेशन शेअर करण्याची सोय, ग्रुप किंवा प्रायव्हेट चॅटमध्ये मित्रांसाठी टोपणनावे सेट करण्याचा पर्याय तसेच 300+ नवीन स्टिकर्स आणि विविध थीम्ससह स्टिकर्सचा समावेश, ज्यामुळे चॅट अधिक मजेशीर होईल.

Instagram new feature
Top 10 Mobiles in 2024 : आयफोन 16 पासून वनप्लस Nord 4 पर्यंत, 'या' 10 स्मार्टफोन्सनी गाजवलं 2024 हे वर्ष

स्नॅपचॅटसारख्या अ‍ॅप्सला टक्कर देण्यासाठी आणि वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी इंस्टाग्रामने हे बदल केले आहेत. या नव्या फिचर्समुळे क्रिएटर्सना त्यांच्या कंटेंटसाठी अधिक चांगले प्रयोग करता येतील, तसेच नॉन-फॉलोअर्सपर्यंत पोहोचून लोकप्रियता वाढवता येईल.

जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल आणि तुमच्या व्हिडिओंच्या प्रयोगांसाठी योग्य प्लॅटफॉर्म शोधत असाल, तर ट्रायल रील्स तुमच्यासाठी एक महत्त्वाची सुविधा ठरू शकते. आता वेळ आली आहे, प्रयोगशील व्हा आणि इंस्टाग्रामच्या नवीन वैशिष्ट्यांचा पुरेपूर उपयोग करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com