Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

इन्स्टाग्रामने एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. लहान कंटेंट क्रिएटर्सना या बदललेल्या अल्गोरिदममुळे फायदा होणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
Instagram Algorithm
Instagram AlgorithmeSakal

Instagram new Algorithm : इन्स्टाग्रामने आपल्या अल्गोरिदमसंदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर ओरिजिनल कंटेंटला जास्त प्राधान्य अशा हिशोबाने नियम बदलले आहेत. त्यामुळे इन्स्टाग्राम वापरणाऱ्या सर्वांनाच हे नियम माहिती असणं गरजेचं आहे.

इन्स्टाग्रामने एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. लहान कंटेंट क्रिएटर्सना या बदललेल्या अल्गोरिदममुळे फायदा होणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तसंच दुसऱ्यांचा कंटेंट रिपोस्ट करणाऱ्यांना यामुळे आळा बसणार आहे. कंपनीने नेमके काय बदल केले आहेत, जाणून घेऊया.

1. डुप्लिकेट कंटेंट

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामच्या रिकमेंडेशन फीडमधून आता रिपोस्ट केलेल्या पोस्टना हटवण्यात येणार आहे. यामुळे डुप्लिकेट कंटेंट कमी होण्यास मदत होईल. तसंच, दुसऱ्यांच्या पोस्ट वारंवार रिपोस्ट करणाऱ्या यूजर्ससाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. जर एखाद्या यूजरने 30 दिवसांच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांचा कंटेंट 10 पेक्षा अधिक वेळा रिपोस्ट केला; तर त्या पोस्ट रिकमेंडेशनमध्ये घेण्यात येणार नाहीत.

Instagram Algorithm
Instagram Tips : इन्स्टाग्रामवर अश्लील रील्स आणि फोटो पाहून वैतागलात? एका सेटिंगने होईल सगळ्यांचा बंदोबस्त

2. पोस्ट-रिपोस्ट

इन्स्टाग्रामवर रिपोस्ट करुन हजारोंमध्ये व्ह्यू आणि लाईक्स मिळवणारे भरपूर अकाउंट आहेत. मात्र आता या अकाउंट्सना मिळणारा भाव कमी होणार आहे. एखादा रिपोस्ट केलेला कंटेंट व्हायरल जात असला, तरीही रिकमेंडेशनमध्ये ओरिजिनल पोस्टलाच प्राधान्य दिलं जाणार आहे.

3. लहान क्रिएटर्स

इन्स्टाग्रामच्या या बदललेल्या अल्गोरिदमचा फायदा लहान कंटेंट क्रिएटर्सना होणार आहे. ज्या लोकांना कमी फॉलोवर्स आहेत, मात्र ते ओरिजिनल कंटेंट पोस्ट करत आहेत त्यांना आता इन्स्टाग्राम अधिक संधी देणार आहे. यापूर्वी केवळ अधिक फॉलोवर्स असणाऱ्या यूजर्सना रिकमेंडेशनमध्ये प्राधान्य दिलं जात होतं, मात्र आता हे बदलणार आहे.

Instagram Algorithm
Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

4. ओरिजिनल कंटेंट क्रिएटर

इन्स्टाग्रामवर आता ओरिजिनल कंटेंट शेअर करणाऱ्यांना वेगळी ओळख मिळणार आहे. ओरिजिनल पोस्टवर 'ओरिजिनल कंटेंट क्रिएटर' असं लेबल मिळणार आहे. यामुळे ती पोस्ट रिपोस्ट केल्यानंतर देखील ओरिजिनल कंटेंट कुणाचा आहे हे लक्षात येणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com