भारतात 15,000 तज्ज्ञांना 'इंटेल' देणार 'एआय' प्रशिक्षण

टीम ई सकाळ
बुधवार, 5 एप्रिल 2017

भारतात बंगळूरमधील 'इंटेल इंडिया'च्या ऑफिसमध्ये आज (बुधवार) जगातील पहिला 'एआय दिन' साजरा झाला. भारतातील डेव्हलपर्स समुदायाला नव्या प्रशिक्षण कार्यक्रमात सामावून घेण्यासाठी 'इंटेल'ने 15,000 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना 'एआय'चे मुलभूत आणि प्रगत शिक्षण देण्याची घोषणा यानिमित्ताने केली. शास्त्रज्ञ, डेव्हलपर्स, अॅनॅलिस्टस् आणि इंजिनिअर्सना कंपनी प्रशिक्षण देईल. 'डीप लर्निंग' आणि 'मशिन लर्निंग' या आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील दोन प्रमुख विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल.

असे म्हणतात, की 'डेटा' म्हणजे नव्या युगातील 'तेल' आहे. तेलाच्या वापरानंतर जगाची अर्थव्यवस्था बदलली. नवे विकसित देश उदयाला आले. नव्या युगात 'डेटा'चे व्यवस्थापन असेच बदल घडवेल, असे मानले जात आहे.

नव्या युगातील 'डेटा' नावाच्या तेलाची सर्वात मोठी 'शुद्धिकरण' फॅक्टरी म्हणून 'इंटेल कॉर्पोरेशन' कंपनीकडे पाहिले जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ची पहाट होण्याचा सध्याचा काळ आहे. येत्या पाच वर्षांत, 2022 पर्यंत 'एआय'ची उलाढाल तब्बल 1,250 अब्ज रूपयांवर पोहोचणार आहे. उगवत्या 'एआय' क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी 'इंटेल' कंपनी पुढे सरसावली आहे. भारत आणि चीनमधील कुशल मनुष्यबळाचा वापर करून 'एआय'चा विकास करणे आणि 'एआय'चा वापर या दोन्ही विशाल देशांमध्ये जास्तीत जास्त वाढविणे यासाठी कंपनी काम करणार आहे. 

भारतात बंगळूरमधील 'इंटेल इंडिया'च्या ऑफिसमध्ये आज (बुधवार) जगातील पहिला 'एआय दिन' साजरा झाला. भारतातील डेव्हलपर्स समुदायाला नव्या प्रशिक्षण कार्यक्रमात सामावून घेण्यासाठी 'इंटेल'ने 15,000 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना 'एआय'चे मुलभूत आणि प्रगत शिक्षण देण्याची घोषणा यानिमित्ताने केली. 'इंटेल इंडिया'च्या कार्यक्रमातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तज्ज्ञांचा भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राच्या भविष्यातील प्रगतीत मोठा वाटा राहिल, असे कंपनीला वाटते आहे. शास्त्रज्ञ, डेव्हलपर्स, अॅनॅलिस्टस् आणि इंजिनिअर्सना कंपनी प्रशिक्षण देईल. 'डीप लर्निंग' आणि 'मशिन लर्निंग' या आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील दोन प्रमुख विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. 

काय आहे 'इंटेल एआय पर्स्यूट'?

'एआय'चा स्विकार व्हावा आणि त्यावर प्रयोग करता यावेत, यासाठी 'इंटेल इंडिया' येत्या वर्षभरात भारतात वेगवेगळे 60 कार्यक्रम आयोजित करणार आहे. रोड शोज्, कार्यशाळा आणि परिषदांचे नियोजन कंपनीने 'एआय'च्या प्रचार आणि प्रसारासाठी केले आहे. सध्या जगभरात असलेल्या 'डेटा सेंटर्स'मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा परवलीचा शब्द बनला आहे. कंपन्या कधी नव्हे एवढा डेटा गोळा करीत आहेत. 'डेटा'च्या विश्लेषणाला (अॅनॅलिटिक्स) प्रचंड मागणी आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील अंदाजानुसार, येत्या तीन वर्षांत 'डेटा सेंटर्स'मध्ये इतर कोणत्याही कामापेक्षा 'डेटा'च्या विश्लेषणासाठी सर्वाधिक सर्व्हर्स काम करत असतील. 

आजघडीला 'डेटा' विश्लेषणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर 'डेटा सेंटर्स'पैकी 97 टक्के ठिकाणी 'इंटेल'ची सेवा घेतली जाते. स्वाभाविकपणे 'एआय' क्षेत्रात 'इंटेल'ला प्रतिस्पर्धी नाही. तथापि, या क्षेत्राचा अफाट विस्तार होऊ पाहात असल्याने कंपनीची सध्याची एकाधिकारशाही कायम राहणे अवघड आहे. त्यामुळेच कंपनीने विस्तार आणि विकासासाठी भारतापासून सुरूवात करण्याचे ठरविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intel to provide artificial intelligence education to Indian experts