महाराष्ट्रातील 'या' शहरांसह १२ ठिकाणी सुरू झाली जिओची ५जी सेवा, फोनच्या सेटिंग्समध्ये बदल करून त्वरित घ्या लाभ |Jio 5G | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio 5G

Jio 5G: महाराष्ट्रातील 'या' शहरांसह १२ ठिकाणी सुरू झाली जिओची ५जी सेवा, फोनच्या सेटिंग्समध्ये बदल करून त्वरित घ्या लाभ

Jio 5G Rollout: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने ५जी सेवा रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. सध्या Jio True 5G सेवेचा फायदा देशभरातील १२ शहरामधील नागरिकांना मिळत आहे. कंपनी पुढील वर्षी संपूर्ण देशात ५जी सेवा सुरू करणार आहे. तुम्ही देखील ५जी रोलआउट झालेल्या शहरांमध्ये राहत असाल व सेवेचा लाभ घेणे शक्य नसल्यास Jio Welcome Offer चा भाग व्हावा लागेल. यासाठी तुम्हाला MyJio अ‍ॅपमध्ये जाऊन Jio Welcome Offer मध्ये सहभागी व्हावे लागेल. यानंतर ५जी टेस्टिंग सुरू करू शकता.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

या १२ शहरांमध्ये सुरू झाली ५जी सेवा

रिलायन्स जिओने सुरुवातील मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, चैन्नई, वाराणसी, कोलकत्ता, पुणे, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, बंगळुरू आणि फरीदाबाद या १२ शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. तुम्ही देखील या शहरात राहत असाल व ५जी फोन असल्यास सेटिंग्समध्ये बदल करून ५जी कनेक्टिव्हिटीचा फायदा घेऊ शकतो.

हेही वाचा: BSA Scrambler: रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी येतेय 'ही' भन्नाट बाईक, पॉवरफुल इंजिनसह मिळेल बरचं काही

फोनच्या सेटिंग्समध्ये करा बदल

  • सर्वात प्रथम तुमच्या ५जी फोनच्या सेटिंग्समध्ये जा.

  • येथे Connections मध्ये Mobile Network पर्यायावर क्लिक करा.

  • आता 5G Network Mode हा पर्याय निवडा.

  • यानंतर तुमच्या भागात ५जी नेटवर्क उपलब्ध असल्यास या सेवेचा फायदा घेऊ शकता.

या गोष्टी ठेवा लक्षात

लक्षात ठेवा की, ५जी कनेक्टिव्हिटीचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे ५जी स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. अनेक ५जी स्मार्टफोन्सला आवश्यक अपडेट देखील मिळाले नाहीत. त्यामुळे ५जी सेवेचा वापर करणे शक्य होत नाही. सध्या जिओ यूजर्स २३९ रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या प्लान्समध्ये ५जी सेवा वापरू शकतात.