esakal | Apple iPad चे 'हे' नवीन मॉडेल्स लवकरच होणार लॉन्च
sakal

बोलून बातमी शोधा

Apple iPad चे 'हे' नवीन मॉडेल्स लवकरच  होणार लॉन्च

Apple iPad चे 'हे' नवीन मॉडेल्स लवकरच होणार लॉन्च

sakal_logo
By
अर्चना बनगे

iPadचे अपकमिंग मॉडेल बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहेत. या सर्व डिव्हाइसची किंमत, फीचर किंवा लाँच करण्याविषयी अहवाल लीक होत आहेत. आता आणखी एक अहवाल समोर आला आहे. ज्यामधून आयपॅडच्या डिस्प्लेशी संबंधित माहिती मिळाली आहे. (ipad-new-model-release-price-and-specifications-science-and-technology-marathi-news)

अमेरिकन टेक कंपनी Apple जगभरात आपल्या प्रीमियम स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी ओळखली जाते. या कंपनीच्या आगामी डिव्हाइसशी संबंधित रिपोर्ट्स,चर्चा नेहमी होत राहतात. ज्यातून अपकमिंग आयपॅडच्या डिस्प्ले संबंधित माहिती मिळत राहते. 9 to 5 Mac ने दिलेल्या रिपोर्ट नुसार, Apple लीकस्टर मार्क गुरमान म्हणतात की, अपकमिंग आयपॅडच्या सर्व मॉडेल्समध्ये मोठा डिस्प्ले असणार आहे. या डिस्प्लेचा आकार 14 इंच असू शकतो. सध्या कंपनीत मोठा डिस्प्ले आहे ज्याची स्क्रीन आकार 12.9 इंचाची आहे.

नवीन आयपॅडला या प्रोसेसरचे सहकार्य मिळेल

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, एम 1 प्रोसेसर Apple च्या आगामी आयपॅडमध्ये देण्यात येणार आहे. हे डिव्हाइस लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. या डिव्हाइसची किंमत प्रीमियम रेंजमध्ये असेल. याशिवाय फारशी माहिती मिळाली नाही. त्याचबरोबर नवीन आयपॅडच्या लॉन्चिंग, किंमत किंवा स्पेसिफिकेशनबद्दल कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

iPad Pro वरुन पडदा उठविला

Apple ने एप्रिल 2021 मध्ये भारतीय बाजारात आयपॅड प्रो बाजारात आणला. या स्मार्टफोनची सुरूवातीची किंमत 71,900 रुपये आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलयचंच झाले तर, थंडरबोल्ट आणि यूएसबी 4 आयपॅड प्रो ला सपार्ट मिळेल. Apple टॅब्लेटमध्ये एक ऑल न्यू अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. जो 12 MP सेन्सर आणि 120-डिग्री फील्ड ऑफ व्यूसह सज्ज आहे. या टॅबलेटमध्ये M1 चिपसेट वापरला गेला आहे. यात लिक्विड रेटिना एक्सडीआर डिस्प्ले चा सपोर्ट दिला आहे. Apple चा नवीन 12.9-इंचाचा आयपॅड प्रो प्रथमच 1000 निट्स च्या फुल स्क्रीन ब्राइटनेस आणि 1600 पीक ब्राइटनेसचा वापर करतो.

हेही वाचा- जाणून घ्या; Google Search प्लेटफॉर्मचे नवे 3 फिचर्स

कॅमरा सेक्शन

आयपॅड प्रोमध्ये 8-कोर Apple M1 मध्ये चिपसेट वापरली गेली आहे. थंडरबोल्ट कनेक्टिव्हिटी कंपनीने दिली आहे. Apple कडून नवीन आयपॅड प्रोमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी देण्यात येत आहे. कॅमेरा डिपॉर्टमेंटमध्ये आयपॅड प्रो ड्युअल लेन्स कॅमेरा सेट-अपसह येतो. जो लिडर सेन्सर तसेच वाइड एंगल 12 एमपी सेंसर सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. त्याचा फील्ड ऑफ व्यू (दृश्य क्षेत्र) 120 डिग्री आहे. नवीन आयपॅड प्रो मध्ये एक TrueDepth कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये, फास्ट अनलॉकसाठी फेशियल रिकग्निशनचा सपोर्ट देण्यात आला आहे.

loading image
go to top