iPadOS 26 Update : खुशखबर! iPadOS 26 ची झाली एन्ट्री; नवे स्मार्ट फीचर्स, एकदा बघाच

iPadOS 26 मध्ये अ‍ॅपलने आयपॅडसाठी स्मार्ट AI, नव्या डिझाईन्स आणि मल्टीटास्किंग फिचर्ससह मोठे अपडेट आणले आहे.
iPadOS 26 brings smart features and new design to iPad
iPadOS 26 brings smart features and new design to iPadesakal
Updated on

WWDC 2025 iPadOS Update : अ‍ॅपलने आपल्या अत्याधुनिक iPadOS चा नवा अपडेट iPadOS 26 सादर करत आयपॅडच्या वापराचा संपूर्ण अनुभवच बदलून टाकला आहे. नव्या अपडेटमध्ये अशा काही फीचर्सचा समावेश आहे, जे iPad ला केवळ एक टॅब्लेट न ठेवता तो एक संपूर्ण प्रॉडक्टिव्हिटी आणि क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्म बनवतात.

नवीन डिझाइन ‘लिक्विड ग्लास’

iPadOS 26 मध्ये अ‍ॅपलने ‘Liquid Glass’ नावाचे एक पारदर्शक व्हिज्युअल इंटरफेस आणले आहे, जे वापरकर्त्याच्या स्पर्श आणि प्रकाशाच्या बदलावर प्रतिसाद देतो. यामुळे Lock Screen, Control Center आणि Home Screen अधिक आकर्षक वाटतात. यामध्ये हलती थीम्स, अ‍ॅप आयकन्ससाठी नवे शैलीकरण आणि लाईट/डार्क मोडमध्ये सुसंगतता या गोष्टी आल्या आहेत.

नवीन Windowing System

iPadOS 26 मध्ये पूर्णतः नव्याने डिझाईन केलेली विंडो सिस्टम वापरकर्त्यांना अ‍ॅप्स आकारानुसार हलवता येतात आणि टाईल स्वरूपात व्यवस्थीत करता येतील. Mac प्रमाणेच Minimize, Exposé आणि Stage Manager ची सहज जोड मिळाली आहे. नवीन मेनू बारमुळे कमांड्सवर जलद अ‍ॅक्सेस मिळतो आणि हे सर्व बाह्य डिस्प्लेवरही उत्तम प्रकारे चालते.

iPadOS 26 brings smart features and new design to iPad
iOS 26 Download : आयफोनमध्ये अ‍ॅपलचे iOS 26 अपडेट डाउनलोड करा एका क्लिकवर..

Apple Intelligence स्मार्ट फीचर

iPadOS 26 मध्ये अ‍ॅपलच्या AI क्षमता आणखी प्रगल्भ झाल्या आहेत. Live Translation आता Messages, FaceTime आणि Phone मध्ये थेट वापरता येते. वापरकर्ते Genmoji वापरून पर्सनल इमोजी तयार करू शकतात, तर Image Playground मध्ये AI द्वारे चित्रं तयार केली जातात. Shortcuts अ‍ॅप आता व्याख्यानांचे सारांश तयार करणे, विशिष्ट आर्ट स्टाईल बनवणे यांसारख्या गोष्टींसाठी AI वापरतो.

Files आणि Preview अ‍ॅपमध्ये बदल

Files अ‍ॅपमध्ये आता रंगीत फोल्डर्स, इमोजी वापरण्याची सुविधा, रीसायजेबल लिस्ट व्ह्यू आणि डॉक फोल्डरचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. Mac मधील प्रसिद्ध Preview अ‍ॅप आता iPad वरही आले असून, वापरकर्ते PDF आणि फोटो एडिट, Annotate आणि AutoFill करू शकतात. यासाठी Apple Pencil चा उत्कृष्ट वापर करता येतो.

iPadOS 26 brings smart features and new design to iPad
WWDC 2025 मध्ये iOS 26 चे पदार्पण; iPhone चा चेहरा बदलणारे 10 जबरदस्त फिचर्स, एकदा बघाच

क्रिएटिव्ह टूल्स आणि बॅकग्राऊंड टास्क्स

iPadOS 26 मध्ये व्हिडिओ कॉल्स आणि रेकॉर्डिंगसाठी App specific माइक असाइनमेंट, Voice Isolation आणि Local Capture यासारखी फीचर्स आल्या आहेत. तसेच बॅकग्राऊंड टास्क्स आता Live Activities स्वरूपात दिसतात, जे विशेषतः ऑडिओ-व्हिडिओ रेंडरिंगसाठी उपयुक्त आहे.

  • Journal अ‍ॅप आता iPad वर उपलब्ध असून, पर्सनल एक्सपिरियंसची नोंद ठेवण्यासाठी हे अ‍ॅप उपयोगी आहे.

  • Apple Games अ‍ॅप संपूर्ण गेम लायब्ररीला व्यवस्थित ठेवतो.

  • Messages मध्ये आता चॅट बॅकग्राऊंड्स, मतदान पर्याय (Polls) आणि Apple Cash ची जोड देण्यात आली आहे.

  • Phone अ‍ॅप देखील iPad वर प्रथमच आल्याने Call Screening आणि Hold Assist यासारख्या फोन फिचर्स मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com