esakal | iPhone 12 चे नवीन कलर वेरिएंट आणि AirTags ट्रैकर लॉन्च, जाणून घ्या किंमत

बोलून बातमी शोधा

iphone 12 new purple color variant

iPhone 12 चे नवीन कलर वेरिएंट आणि AirTags ट्रैकर लॉन्च, जाणून घ्या किंमत

sakal_logo
By
रोहित कणसे

Apple ने गुरुवारी आपला स्प्रिंग लोड इव्हेंट जाहीर केला. यावेळी Apple ने iPhone 12 चे नवीन कलर व्हेरियंट जाहीर केले आहेत. Apple iPhone 12चा नवीन कलर पर्पल कलर ऑप्शनमध्ये देखील उपलब्ध होणार आहे. हा पर्पल कलर अपडेटiPhone 12 आणि iPhone 12 मिनी वर देण्यात आले आहे. या आठवड्यापासून त्याची प्री ऑर्डर केली जाऊ शकते. आयफोन काळ्या, निळ्या, हिरव्या, लाल, पांढर्‍या आणि जांभळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये घेता येईल. याशिवाय Apple च्या कार्यक्रमात बहुप्रतिक्षित AirTags ट्रॅकर लॉन्च करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे इतर कोणतेही डिव्हाइस सहज शोधू शकतील.

किंमत आणि उपलब्धता

आयफोन 12 आणि आयफोन 12 मिनीचे नवीन नवीन पर्पल कलर व्हेरियंट शुक्रवार, 23 एप्रिलपासून 30 देशांमध्ये पूर्व-ऑर्डर प्री ऑर्डर केले जातील. 30 एप्रिलपासून त्याची विक्री सुरू होईल. iPhone 12 च्या पर्पल व्हेरियंटची किंमत 79,900 रुपये आहे. तर iPhone 12 मिनी स्मार्टफोन 69,900 रुपयांमध्ये येईल. एअरटॅगची किंमत 3,190 रुपये आहे. तर 4 पॅकची किंमत 10,900 रुपये आहे. हर्मीस एडिशन अ‍ॅक्सेसरीजसह लॉन्च करण्यात आले आहेत. 30 एप्रिलपासून त्याची विक्री सुरू होईल.

Apple एअर टॅग्स फीचर्स

एअरटॅग अल्ट्रा-वाइडबँड (यूडब्ल्यूबी) तंत्रज्ञान वापरतात. हे यू 1 चिपसेटसह येते जे आयफोन, आयपॅड आणि Apple वॉच मॉडेल्स सारख्या Apple डिव्हाइस शोधण्यात मदत करते. एअलरटॅग्स ऑडिओ तंत्रज्ञानासह सादर करण्यात आले आहेत. यास बिल्ट-इन स्पीकरसह ब्लूटूथ सपोर्ट देण्यात आला आहे. हे एनएफसी आणि ब्लूटूथ LE कनेक्टिव्हिटी देते. एअलरटॅग्सला सिरी सपोर्ट देण्यात आले आहे. त्यात एक वर्षाची बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. एअर टॅग्स आयपी 67 वॉटर आणि डस्ट रेजिस्टंट सपोर्टसह देण्यात आले आहेत आणि हे आयफोनशी कनेक्ट केले जाऊ शकते.