iPhone 13 पुढं सगळे फेल! तर जगभरात सर्वाधिक विकले गेले 'हे' 10 स्मार्टफोन; वाचा डिटेल्स

iphone 13 best selling smartphone in world top 10 global bestseller smartphone in 2022
iphone 13 best selling smartphone in world top 10 global bestseller smartphone in 2022

iPhone 13 हा जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोनपैकी एक आहे. Apple iPhone 13 2022 मध्ये सर्वाधिक विक्री होणारा फोन ठरला आहे. काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे 2022 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-10 स्मार्टफोनमध्ये 8 अॅपल फोन्सचा समावेश आहे.

अॅपलशिवाय या यादीत फक्त सॅमसंगला स्थान मिळाले आहे. सॅमसंगचे दोन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Galaxy A13 आणि Galaxy A03 हे देखील जगातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्समध्ये होते. विशेष म्हणजे या यादीत OnePlus आणि Xiaomi सारख्या चीनी कंपन्यांचा एकही फोन नाहीये.

रिसर्च फर्म ग्लोबल मंथली हँडसेट मॉडेल सेल्स ट्रॅकर (Global Monthly Handset Model Sales Tracker)ने काही आकडे शेअर केले आहेत. टॉप-10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत 8 क्रमांकावर Apple ने वर्चस्व गाजवलं आहे. 2022 मधील एकूण जागतिक स्मार्टफोन विक्रीपैकी सुमारे 19 टक्के वाटा हा या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या टॉप-10 डिव्हाइसचा आहे.

iphone 13 best selling smartphone in world top 10 global bestseller smartphone in 2022
Pune News : डीजेचा दणदणाट, वैतागलेल्या ज्येष्ठ नागरिकाने फोडली १० लाखांची साऊंड सिस्टीम

iPhone 13 सर्वाधिक विकला गेलेला स्मार्टफोन

2022 चा बेस्ट सेलिंग स्मार्टफोन iPhone 13 हा असून, आयफोनच्या एकूण जागतिक विक्रीत या फोनचा वाटा 28 टक्के आहे . सप्टेंबर 2021 मध्ये लॉन्च झाल्यापासून, ऑगस्ट 2022 पर्यंत, Apple iPhone 13 हा दर महिन्याला सर्वाधिक विकला जाणारा iPhone ठरला आहे.

चीन, अमेरिका, यूके, जर्मनी आणि फ्रान्समध्ये iPhone 13 सर्वाधिक विकला गेला. त्याच वेळी, आयफोन 14 सीरिज लॉन्च झाल्यानंतर, डेव्हलपींग बाजारपेठेत किंमती कमी झाल्यानंतर आयफोन 13 ची विक्री वाढल्याचे समोर आले आहे.

iphone 13 best selling smartphone in world top 10 global bestseller smartphone in 2022
Ritesh Agarwal : OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचा 20व्या मजल्यावरून पडून मृत्यू

iPhone 13 नंतर, सर्वात जास्त विकले गेलेले iPhone 13 Pro Max आणि iPhone 14 Pro Max हे स्मार्टफोन्स आहेत. आकडेवारीनुसार, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वाधिक विक्री होणारा आयफोन iPhone 14 Pro Max हा होता.

iPhone 13 Pro पाचव्या, iPhone 12 सहाव्या, iPhone 14 सातव्या, iPhone 14 Pro आठव्या आणि iPhone SE 22 ने नवव्या क्रमांकावर आपले स्थान मिळवले.

Samsung Galaxy A13 हा चौथा सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन होता. Galaxy A03 या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. काउंटरपॉईंटच्या दाव्यानुसार 2023 मध्ये देखील या टॉप-10 स्मार्टफोन्सचा मार्केट शेअर वाढेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com