IPhone 13 मध्ये असणार छोटा नॉच; आणखी काय असेल विशेष वाचा...

IPhone 13 will have a small notch; What else will be special Read smart phone Nagpur news
IPhone 13 will have a small notch; What else will be special Read smart phone Nagpur news

नागपूर : युवावर्गामध्ये ॲपलचे फोन चांगलेच प्रसिद्ध आहे. आयफोन जवळ असलेल्या व्यक्ती स्टाईलच काही वेगळी असते. हे फोन बाळगणारे व्यक्ती श्रीमंत असतात अशी समज झाली आहे. कारण, ॲपलचे हे फोन महाग असतात. सामान्य व्यक्ती विकत घेण्याचे फक्त स्वप्नच पाहत राहतो. अनेकांनी हा फोन विकत घेण्यासाठी किडणी विकल्याचे अनेकदा समोर आले आहे. तसेच घरच्यांनी आयफोन विकत घेऊन न दिल्याने युवकांनी आत्महत्या केल्याचे आपण वर्तमान पत्रात वाचले आहे. इतका महागडा आयफोन ग्राहकांसाठी काही नवीन फिचर घेऊन येत आहे.

ॲपलच्या आयफोनचे नाव घेताच अनेकांच्या भुवया उंचावतात. काय नवीन आल असेल या फोनमध्ये राव, असाच प्रश्न वापरकर्ते एकमेकांना विचारत असतात. हा नवीन फोन आपल्याकडेच असावा यासाठी वापरकर्त्यांची धावपळ सुरू असते. यासाठी ते जुना फोनही विक्रीसाठी काढत असतात. आपण पहिले फोन विकत घेतला हे सांगण्यासाठी हा सर्व आटापिटा असतो. अपडेटेट आयफोन आपल्याकडे असावा असा त्यांना आग्रह असतो. चला तर माहिती करूया आता कोणचे नवीन फिचर घेऊन येतोय आयफोन...

ॲपल कंपनी आयफोन १३ वर काम करीत आहे. ते यावर्षी बाजारात येण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये छोटी खाच दिली जाऊ शकते. इतकेच नव्हे तर फोल्ड होणारा फोन २०२३ मध्ये बाजारात आणू शकते. ॲपलने आयफोन १० (आयफोन एक्स)मध्ये नॉचचा वापर केला होता. याचा उद्देश वापरकर्त्यांना संपूर्ण दृश्याचा अनुभव मिळवून देणे हा होता. यानंतर दुसऱ्या मोबाइल कंपन्यांनी याची सुरुवात केली.

यामुळेच ॲपलने एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता कंपनी आयफोन १३ मध्ये एक छोटी खाच देणार असल्याची माहिती मिंग-ची कुओ यांनी दिली आहे. छोट्या नॉचसह आयफोन १३ मध्ये १२० डिग्री हर्ट्झचा रीफ्रेश रेट देखील मिळणार आहे. परंतु, रीफ्रेश रेट फक्त प्रो मॉडेलमध्ये मिळणार आहे. तसेच एक चांगली ५G मॉडेल आणि मोठी बॅटरी सुद्धा मिळू शकते.

बऱ्याच बाबतीत असेल भिन्न

यावर्षी लाँच केलेला आयफोन १३ मागील वर्षी लॉंच झालेल्या आयफोन १२ पेक्षा लक्षणीय आणि चांगला असेल. मात्र, डिझाइनमध्ये जास्त काही फरक राहणार नाही. परंतु, यात लहान आकाराचा खाच नक्कीच असेल. यात सेल्फी कॅमेरा राहील. आता अशी अफवा आहे की कंपनी आपली मिनी आवृत्ती थांबवू शकते. मात्र, कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच नवीन आयफोनमध्ये लाइटनिंग कनेक्शन देखील असेल. ते बॅटरी चार्ज करेल आणि डेटा ट्रान्सफरमध्ये देखील उपयुक्त ठरेल.

२०२३ मध्ये फोल्डेबल आयफोन

ॲपल फोल्डेबल फोन सन २०२३ मध्ये लाँच करू शकते. त्याला ७.५ इंच ते ८ इंचाचा स्क्रीन दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड -२ प्रमाणेच असू शकतो. सॅमसंग, हुआवे आणि मोटोरोलाने स्वत:चे फोल्डेबल फोन यापूर्वीच बाजारात आणले आहेत.

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com