Apple iPhone: 7 तारखेला होणार iphone 14 लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् स्पेसिफिकेशन

Apple कंपनी 7 सप्टेंबरला चार नवीन iPhones लॉन्च करणार आहे
Apple iPhone: 7 तारखेला होणार iphone 14 लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् स्पेसिफिकेशन

दिग्गज कंपनी म्हणून ओळखली जाणारी Apple कंपनी 7 सप्टेंबरला चार नवीन iPhones लॉन्च करणार आहे. iPhone यामध्ये iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे फोन लॉन्च करणार आहे. भारतातील वेळेनुसार Apple iPhone 14 सीरिजचा लॉन्चचा कार्यक्रम रात्री 10:30 वाजता सुरू होणार आहे. आयफोन 12 आणि आयफोन 13 सह, कंपनीने 4 मॉडेल लॉन्च केले.

या फोनचे कलर ग्रेफाइट, सिल्व्हर, गोल्ड आणि पर्पल कलरमध्ये iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max देण्याची शक्यता आहे. आयफोन 14 हा काही प्रमाणात आयफोन 13 सारखाच दिसतो. iPhone 14 च्या कॅमेरा आणि बॅटरीमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याच्या प्रो मॉडेलमध्ये 48 एमपी वाइड-एंगल कॅमेरासह 12MP अल्ट्रावाईड आणि टेलिफोटो सेन्सर असण्याची शक्यता आहे.

आयफोन iphone 14 सीरीजच्या किंमती लीक झाल्या आहेत. मिळालेल्या अहवालानुसार, iPhone 14 ची किंमत 59,440 रूपये, iPhone 14 Max ची किंमत 67376 रूपये, iPhone 14 Pro ची किंमत 83248 रूपये आणि iPhone 14 Pro Max ची किंमत 91184 आहे. मात्र, जास्त करांमुळे भारतात त्यांच्या किमती जास्त असू शकतात. आयफोन 14 आणि आयफोन 14 मॅक्समध्ये A15 बायोनिक चिप दिली जात आहे, तर इतर दोन मॉडेल्समध्ये A16 बायोनिक चिप दिली जाईल असा दावाही अहवालात करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com