आयफोन 14 'या' तारखेला होणार लाँच; प्री ऑर्डरची तारीख देखील उघड

iphone 14 series launch date
iphone 14 series launch date

Apple लवकरच आपली नवीन iPhone सीरीज iPhone 14 लॉन्च करणार आहे. Apple च्या म्हणण्यानुसार, ही सीरिज सप्टेंबरमध्ये बाजारात आणली जाईल, अॅपलने अद्याप लॉंचची तारीख जाहीर केलेली नाही. लीक्स झालेल्या मिडीया रिपोर्टनुसार, Apple 13 सप्टेंबर 2022 रोजी iPhone 14 सीरीज लॉन्च करू शकते. (iphone 14 series launch date)

अॅपलचा iPhone 14 Pro Max मोठ्या कॅमेरा मॉड्यूलसह ​​बाजारात आणला जाईल अशी माहिती समोर आली आहे. iPhone 14 आणि iPhone 14 Pro 6.1-इंच पॅनेलसह लॉन्च करणअयात येतील असा दावा देखील केला जात आहेत, तर iPhone 14 Plus आणि iPhone 14 Pro Max 6.7-इंच पॅनेलसह लॉन्च केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

iPhone 14 सीरीजमध्ये कॅमेरा कसा असेल?

लीक्सनुसार, Apple च्या iPhone 14 सीरीजमध्ये एक मोठा कॅमेरा मॉड्यूल मिळू शकतो. एका टिपस्टरने फोनच्या फिटर्सबद्दल माहिती दिली आहे की, iPhone 14 Pro Max 12-मेगापिक्सेलऐवजी 48-मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह लॉन्च केला जाईल. असे झाल्यास अॅपलच्या बाजूने हा मोठा बदल असेल. Apple फोनमध्ये सामान्यतः चांगले कॅमेरे असतात, परंतु हा बदल iPhone 14 सीरीजमधील कॅमेरा गुणवत्ता आणखी वाढणार आहे.

iphone 14 series launch date
Jio, Airtel अन् Vi बेस्ट प्लॅन! दररोज 3GB डेटा, फ्री कॉलसह मिळेल बरंच

कधी होणार लॉंच

Apple ने अद्याप अधिकृतपणे तारीख जाहीर केलेली नाही, परंतु लीक्सनुसार, Apple कंपनी 13 सप्टेंबर रोजी iPhone 14 सीरीज लॉन्च करू शकते. Apple या इव्हेंटमध्ये Apple Watch Series 8 आणि Watch Pro व्हर्जन देखील लॉन्च करणार आहे. या व्यतिरिक्त, कंपनी 23 सप्टेंबरपासून अनेक देशांमध्ये नवीन iPhones पाठवणे सुरू करू शकते, तर प्री-ऑर्डर 16 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते.

यापूर्वी, Max Weinbach ने ट्विटरवर iPhone 14 Pro ची डिझाईन इमेज ट्विट केली होती आणि दावा केला होता की iPhone 14 सीरीज नॉचशिवाय ऑफर केली जाईल. iPhone 14 Pro चे डिझाईन स्केच सादर करताना असाही दावा करण्यात आला की iPhone 14 Pro पंचहोल कॅमेरा डिस्प्लेसह लॉन्च केला जाईल.

iphone 14 series launch date
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर महागलं; जाणून घ्या किती वाढली किंमत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com