
सप्टेंबर महिन्यात आयफोन 17 सिरीज लाँच होणार आहे
पण त्याआधीच मोबाईलची किंमत आणि फीचर्स लिक झालेत
चला तर मग जाणून घ्या भारतात आयफोन 17ची काय आहे अपडेट..
iPhone 17 Launch : अॅपलच्या बहुप्रतिक्षित आयफोन 17 सिरीजच्या लाँचिंग आधीच त्याच्या किंमती आणि फीचर्सबाबत माहिती समोर आली आहे. येत्या 9 सप्टेंबरला अवे ड्रॉपिंग इव्हेंटमध्ये अॅपल आयफोन 17, आयफोन 17 एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स लाँच करणार आहे. गेल्यावर्षीच्या आयफोन 16 सिरीजपेक्षा ही नवीन सिरिज मोठ्या अपग्रेड्ससह येणार आहे.