Artificial Intelligence : आप्तस्वकीयांच्या ‘हॅलो’ला ‘एआय’कडून उत्तर! ब्रिटन, अमेरिकेतील इराणच्या नागरिकांना विचित्र अनुभव
Iranian Citizens: इराणमध्ये अडकलेल्या आप्तस्वकीयांकडून ब्रिटन व अमेरिकेतील नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ‘हॅलो’चे उत्तर मिळत आहे. या विचित्र अनुभवामुळे अनेक इराणी नागरिक धास्तावले आहेत.
दुबई : इराणमध्ये अडकलेल्या आप्तस्वकीयांशी संवाद साधल्यानंतर एखाद्या रोबोच्या माध्यमातून निर्मिल्या गेलेल्या आवाजातून उत्तर मिळत आहे. काही ठिकाणी तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात ‘एआय’चा वापर करून तयार केलेला आवाज वापरला जात आहे.