स्मार्ट घड्याळामुळे फास्ट टॅग स्कॅन होतंं का? मग 'हे' वाचा

स्मार्ट घड्याळामुळे फास्ट टॅग स्कॅन होते का?
Fast Tag News
Fast Tag Newsesakal

एका व्हायरल व्हिडिओतून फास्ट टॅग घोटाळा उघडकीस आणला आहे. या व्हिडिओत एक मुलगा कार पुसताना घड्याळाच्या मदतीने फास्ट टॅग स्कॅन करतो. असं होणे ही गोष्ट शक्य नाही. त्यामळे तो व्हिडिओ खोटा आहे. एथिकल हॅकर सनी नेहरा म्हणाले, सदरील व्हिडिओ खोटा आहे. अशा पद्धतीने कोणीही फास्ट टॅग खात्यातून पैसे चोरी शकत नाही. नेहरा यांनी हीच गोष्ट आपल्या ट्विटर (Twitter) हँडलवर समजून सांगितली आहे. फास्ट टॅग (Fast Tag) कशा पद्धतीने काम करते आणि त्यात असलेल्या सुरक्षा व्यवस्था कशा असतात? (Is Scanning Fast Tag Through Smart Watch Right Or Wrong)

Fast Tag News
‘फास्ट टॅग’च्या तक्रारीसाठी स्वतंत्र यंत्रणाच नाही

- प्रत्येक टोल नाक्याला एक विशिष्ट कोड दिलेला असतो.

- तसेच प्रत्येक टोल नाक्याला नॅपर अॅक्वायरर बँक दिलेले असते.

- दोन्ही एनईटीसी सिस्टिमवर असतात. नॅशनल इलेक्ट्राॅनिक टोल कलेक्शन (NETC) सिस्टिम ग्राहकांना कोणत्याही टोलनाक्यावर इलेक्ट्राॅनिक पेमेंट करण्यास मदत करते. कोणत्याही अडथळ्याविना आरएफईडी तंत्रज्ञानाच्या मदतीने हे होते.

- जिओ कोड्स हे प्रत्येक टोला नाक्यावर नोंदवले जातात.

- आयपी हे बँकांसह एसआय आणि एनपीसीआयद्वारे व्हाईटलिस्ट केलेले असतात. याचा अर्थ असा की केवळ मान्यता प्राप्त व्यापारीच (परवान असलेला नाका आणि पार्किंग प्लाझा) आर्थिक व्यवहार जिओ लोकेशनवरुन (कुठून नाही) करु शकतात. तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी टोला प्लाझा आयडीची गरज असते. एनपीएसआय हे सदस्य बँकांशी नेटवर्कच्या माध्यमातून जोडलेले असतात. त्यामुळे सदरील आर्थिक व्यवहार उघड होणे शक्य नसते, असे नेहरा यांनी सांगितले. दुसरीकडे बिल्ट इन सिक्युरिटी मॅकॅनिझम हे नोटिफिकेश अलर्ट्स आहे. एकदा ग्राहकाने फास्ट टॅगमधून पैसे दिल्यास त्याला टोलच्या नावासह एसएमएस मिळतो. यात पैशाचा व्यवहार झालेली तारीख, दिलेली रक्कम आणि फास्ट टॅग खात्यातील असलेली रक्कम कळते. वाहनांचे चालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरुन टोल प्लाझा आकारत असलेले रक्कम तपासता येते.

Fast Tag News
क्रॅश टेस्टच्या आधारे वाहनांना मिळणार 'स्टार रेटिंग' : नितीन गडकरी

व्हिडिओमुळे पेटीम फास्ट टॅगविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. यात स्मार्ट घड्याळाच्या मदतीने स्कॅनिंग फास्ट टॅग दाखवत आहे. एनईटीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार फास्ट टॅगचे पैसे हे केवळ अधिकृत व्यापाऱ्यांकडून घेतले जातात. हे अनेक चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे. पेटीम फास्ट टॅग हे पूर्ण संरक्षण देणारे आणि सुरक्षित असल्याचे पेटीमकडून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com