Israel Cyber War : इस्राइल-पॅलेस्टाईनमध्ये आता 'सायबर वॉर' सुरू; भारताचे हॅकर्सही युद्धाच्या मैदानात - रिपोर्ट्स

Palestine Israel War : इस्राइल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे.
Israel Cyber War
Israel Cyber WareSakal

इस्राइल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. यामध्ये कित्येक नागरिकांचा नाहक बळी देखील गेला आहे. या सगळ्यात एक वेगळी अपडेट समोर येत आहे. जमीनीवर सुरू असलेलं हे युद्ध सायबर जगातही पोहोचलं आहे.

यापूर्वी युक्रेन आणि रशिया युद्धादरम्यान देखील सायबर हल्ल्यांची कित्येक प्रकरणं समोर आली होती. आता पॅलेस्टाईन आणि इस्राइल युद्धामध्ये देखील असा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही देशांवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होत आहेत. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Israel Cyber War
Israel War Update : "आमच्या सैनिकांना पूर्ण सूट.. गाझा पहिल्यासारखं राहणार नाही"; इस्राइलचे संरक्षण मंत्री कडाडले!

जेरुसलेम पोस्ट

8 ऑक्टोबरला जेरुसलेम पोस्ट या मीडिया आउटलेटने म्हटलं होतं, की त्यांच्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होत आहेत. यानंतर त्यांची वेबसाईट क्रॅश झाली होती. हे हॅकिंग सूडानमधील अ‍ॅनोनिमस ग्रुपने केलं होतं.

रेड अलर्ट अ‍ॅप

इस्राइलच्या 'रेड अलर्ट' या फोन अ‍ॅप सिस्टिमवर देखील सायबर हल्ले झाले होते. हे इस्राइलमधील एक रिअल टाईम अटॅक अलर्ट देणारं अ‍ॅप आहे. एखाद्या रॉकेट किंवा मिसाईल हल्ल्यावेळी हे सूचना देतं. अ‍ॅनॉन घोस्ट नावाच्या हॅकर्सच्या ग्रुपने या अ‍ॅपवर सायबर अटॅक केला होता.

Israel Cyber War
Israel War : इस्राइलने परत मिळवला गाझा बॉर्डरवरील भाग; युद्धात आतापर्यंत 3,000 हून अधिक बळी

पॅलेस्टाईन समर्थक हॅकर्स

या युद्धामध्ये पॅलेस्टाईनची साथ देणारे जगभरातील हॅकर्स एकत्र आले आहेत. या सर्वांनी मिळून इस्राइल सरकारच्या वेबसाईट्स आणि इस्राइलमधील इतर वेबसाईट्सवर हल्ला केला जातो आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सुमारे 35 प्रो-पॅलेस्टिनी सायबर ग्रुप्स इस्राइलला टार्गेट करत आहेत.

भारताचा सहभाग

या सायबर युद्धामध्ये भारतीय सायबर हॅकिंग ग्रुप्स देखील आहेत. भारतीय ग्रुप्स हे पॅलेस्टिनी वेबसाईट्सना टार्गेट करत असल्याची माहिती रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. पॅलेस्टाईन नॅशनल बँक आणि देशाच्या इतर महत्त्वाच्या वेबसाईट्सवर या हॅकर्सनी हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून प्रो-पॅल्सिस्टिनी हॅकर्सनी दिल्ली सरकारच्या वेबसाईटवर हल्ला केला. मात्र DDoS वेबसाईट काही काळातच पूर्ववत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com