ISROsakal
विज्ञान-तंत्र
ISRO : ‘सेमी क्रायोजेनिक इंजिन’च्या विकासात ‘इस्रो’ला मोठे यश; पहिली ‘हॉट टेस्ट’ यशस्वी, पुढील चाचण्यांचे नियोजन
Space Technology : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. या इंजिनाची पहिली हॉट टेस्ट यशस्वी झाली असून, पुढील चाचण्यांची योजना करण्यात आली आहे.
बंगळुर : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) २००० किलो न्यूटन (केएन) उच्च क्षमतेचे ‘सेमी क्रायोजेनिक इंजिन’ किंवा द्रवरूप ऑक्सिजन-केरोसीन प्रणोदनाद्वारे संचलित इंजिन विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार पाडला आहे. हे इंजिन ‘लॉन्च व्हेईकल मार्क-३’च्या (एलव्हीएम३) ‘सेमी क्रायोजेनिक बूस्टर स्टेज’साठी वापरले जाणार आहे.