vertical mixer : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सुमारे दहा टन इंधन मिश्रणाचे व्हर्टिकल प्लॅनेटरी मिक्सर तयार केले आहे, ज्याचा उपयोग सॉलिड मोटारसाठी होतो. हा मिक्सर भारतीय अवकाश वाहतूक प्रणालीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
बंगळूर : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीने (इस्रो) सुमारे दहा टन इंधन मिश्रणाचे यंत्र(व्हर्टिकल प्लॅनेटरी मिक्सर) तयार केल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली. या प्रोपेलंटचा वापर सॉलिड मोटारसाठी केला जातो.