ISRO Award : देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोला मिळाला 'एव्हिएशन वीक लॉरेट्स' पुरस्कार

Chandrayaan 3 Mission : अवघ्या 75 मिलियन डॉलर बजेटमध्ये इस्रोने चंद्रावर लँडिंग केलं. तसंच चंद्रावर पाणी आणि सल्फर असल्याची माहिती देखील या मोहिमेतून मिळाली.
Aviation Week Laureates Award
Aviation Week Laureates AwardeSakal

ISRO Gets Aviation Week Laureates Award : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला होता. या कामगिरीबद्दल इस्रोवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. यातच आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे.

अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार इस्रोला मिळाला आहे. 'चांद्रयान-3' मोहिमेसाठी हा पुरस्कार ISRO ला देण्यात आला. "इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ (S. Somanath) यांनी चांद्रयान-2 मोहिमेच्या अपयशातून पुढे जात, चांद्रयान-3 मोहीम यशस्वी केली. या माध्यमातून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा आणि रोव्हर चालवणारा भारत जगातील चौथा देश ठरला. सोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा हा पहिला देश ठरला." असं अधिकृत अवॉर्ड घोषणेत म्हटलं होतं. (Chandrayaan 3)

यात पुढे म्हटलं आहे, "अवघ्या 75 मिलियन डॉलर बजेटमध्ये इस्रोने चंद्रावर लँडिंग केलं. तसंच चंद्रावर पाणी आणि सल्फर असल्याची माहिती देखील या मोहिमेतून मिळाली. ही खरंच मोठी कामगिरी आहे." इस्रोच्या वतीने भारतीय डिप्लोमॅट श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com