ISRO 2024 Missions : पुढचं वर्षही गाजवणार 'इस्रो'; पहिल्या दिवसापासूनच होणार मोहिमांची सुरुवात! पाहा संपूर्ण यादी

कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी इस्रो एक्सपोसॅट (XPoSat) ही मोहीम राबवणार आहे. 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी हा उपग्रह लाँच करण्यात येईल.
ISRO Missions in 2024
ISRO Missions in 2024eSakal

ISRO Upcoming Missions : 2023 या वर्षामध्ये इस्रोने तब्बल 7 यशस्वी मोहिमा राबवल्या. यातील चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला. यासोबतच इस्रोने आपल्या आणि इतर देशांच्या उपग्रहांना देखील यशस्वीपणे लाँच केलं. आता 2024 सालीदेखील इस्रो अनेक मोहिमा राबवणार आहे.

एक्सपोसॅट

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून इस्रोच्या मोहिमांना सुरुवात होणार आहे. कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी इस्रो एक्सपोसॅट (XPoSat) ही मोहीम राबवणार आहे. 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी हा उपग्रह लाँच करण्यात येईल. यासाठी इस्रोच्या विश्वासार्ह पीएसएलव्ही रॉकेटचा वापर करण्यात येईल.

आदित्य एल-1

2023 साली लाँच करण्यात आलेलं आदित्य एल-1 मिशन हे 2024 साली पूर्णत्वाला पोहोचेल. 6 जानेवारी रोजी आदित्य उपग्रह L1 पॉइंटवर पोहोचणार असल्याचं इस्रोने सांगितलं आहे. ही भारताची पहिलीच सौर मोहीम आहे. (Aditya L1)

निसार

नासा-इस्रो सिंथेटिक अपार्चर रेडार, म्हणजेच NISAR ही मोहीम इस्रो आणि नासा मिळून राबवणार आहे. यामुळे दर 12 दिवसांनी पृथ्वीचा अपडेटेड नकाशा मिळवता येणार आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तींची आगावू माहिती आणि पर्यावरणाचं होणारं नुकसान याचा अभ्यास करता येईल.

ISRO Missions in 2024
ISRO Satellite Project : इस्रो अवकाशात सोडणार 50 उपग्रह; भारताच्या आजूबाजूला हजारो किलोमीटर क्षेत्रावर ठेवणार नजर

मंगळयान-2

पहिली मंगळयान (MOM) मोहीम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता इस्रो दुसऱ्या मंगळ मिशनसाठी तयार झाली आहे. यामध्ये अधिक अपग्रेडेड उपकरणं पाठवण्यात येतील, ज्यामुळे मंगळाचा अधिक चांगला अभ्यास करता येईल. 2024 च्या उत्तरार्धात हे मंगळयान-2 (Mangalyaan-2) लाँच होण्याची शक्यता आहे.

शुक्रयान

2024 मध्ये इस्रो व्हीनस ऑर्बिटर मिशन म्हणजेच 'शुक्रयान' (Shukrayaan) देखील राबवणार आहे. याची लाँचिंग डेट अद्याप फिक्स नसली, तरी 2024 मध्ये या मोहिमेवर काम सुरू होणार आहे. या माध्यमातून इस्रो शुक्र ग्रहाचा अभ्यास करेल.

इनसॅट-थ्रीडीएस

INSAT-3DS हा उपग्रह देखील जानेवारीमध्येच लाँच होण्याची शक्यता आहे. हवामानाची माहिती घेणे, आणि आपत्ती व्यवस्थापन करणे यासाठी हा उपग्रह काम करेल.

ISRO Missions in 2024
ISRO New Mission : चंद्र-सूर्यानंतर आता ब्लॅक होलचा अभ्यास करणार इस्रो; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाँच होणार मिशन

गगनयान

गगनयान (Gaganyaan) मोहिमेवर यावर्षीपासूनच काम सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून भारत पहिल्यांदाच अवकाशात अंतराळवीर पाठवणार आहे. 2025 साली याचं उड्डाण होणार असलं, तरी 2024 मध्ये याची रंगीत तालीम होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com