भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस! ISRO ची मोठी मोहीम, भारताचं स्वतःचं GPS होणार शक्तिशाली, NVS-03 उपग्रह का आहे खास?

ISRO NVS-03 Satellite Launch: Key Details : इस्रोच्या NVS-03 उपग्रह प्रक्षेपणामुळे भारताची NavIC दिशादर्शन प्रणाली अधिक सक्षम होणार आहे. स्वदेशी GPS प्रणालीची वैशिष्ट्ये आणि या मोहिमेचे महत्त्व जाणून घ्या.
NavIC Navigation System

ISRO NVS-03 Satellite Launch

esakal

Updated on: 

ISRO NVS-03 Satellite Launch: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आज NVS-03 या नेव्हिगेशन उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV-F18 या प्रक्षेपकाच्या मदतीने हे अभियान राबवले जाणार आहे. भारताची स्वदेशी दिशादर्शन प्रणाली NavIC अधिक आधुनिक, अचूक आणि सक्षम बनवण्याच्या दृष्टीने या प्रक्षेपणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Loading content, please wait...