सगळे गाढ झोपेत असताना भारताने रचला अंतराळात इतिहास! रात्री ११:५१ वाजता नेमकं काय घडलं? ISRO ची मोठी कामगिरी!

ISRO Successfully Launches NVS-03 Navigation Satellite : सर्वजण झोपेत असताना इस्रोने रात्री ११:५१ वाजता NVS-03 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करत भारताच्या स्वदेशी NavIC दिशादर्शक प्रणालीला अधिक बळकटी दिली.
ISRO successfully launches the NVS-03 navigation satellite aboard the GSLV-F18 rocket from Satish Dhawan Space Centre, Sriharikota, strengthening India's indigenous NavIC navigation system

ISRO successfully launches the NVS-03 navigation satellite aboard the GSLV-F18 rocket from Satish Dhawan Space Centre, Sriharikota, strengthening India's indigenous NavIC navigation system

esakal

Updated on: 

भारताच्या स्वदेशी दिशादर्शक यंत्रणेला (NavIC) अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. इस्रोने तिसऱ्या पिढीतील दिशादर्शक उपग्रह NVS-03 चे GSLV-F18 प्रक्षेपकाच्या माध्यमातून यशस्वी प्रक्षेपण केले. रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या मोहिमेला सुरुवात झाली. अचूक प्रक्षेपणानंतर उपग्रहाला जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये (Geosynchronous Transfer Orbit) स्थापित करण्यात आले. या मोहिमेमुळे भारताच्या स्वतःच्या NavIC दिशादर्शक प्रणालीला बळकटी मिळणार आहे.

Loading content, please wait...