
बंगळूर : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) द्रवरूप प्रणोदन (इंधन) प्रणाली केंद्राने (लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर) द्रवरूप इंधन प्रणालीचे एकत्रीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर ‘गगनयान’च्या (जी १) पहिल्या मानवरहित मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अंतराळवीरांना नेऊ शकेल, अशी कुपी (मॉड्यूल) तयार करून सतीश धवन केंद्राकडे पाठविल्याची माहिती ‘इस्रो’कडून बुधवारी देण्यात आली.