ISRO-SpaceX Mission : ‘जीसॅट-एन२’च्या लाँचसाठी इस्रो वापरणार ‘स्पेसएक्स’चा प्रक्षेपक

‘‘इतर कोणताही प्रक्षेपक वेळेत उपलब्ध होत नसल्याने भारताला ‘स्पेसएक्स’शी मदत घ्यावी लागली आहे,’’ असे ‘इस्रो’चे अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी सांगितले.
ISRO-SpaceX Mission
ISRO-SpaceX MissioneSakal
Updated on

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आता अमेरिकेतील उद्योगपती एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ या खासगी संस्थेच्या मदतीने प्रथमच ‘जीसॅट-२०’ (नवे नाव जीसॅट-एन२) या पुढील पिढीतील मोठा दूरसंचार उपग्रह अवकाशात सोडणार आहे.

‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’ (एनएसआयएल) ही ‘इस्रो’ची व्यावसायिक शाखा ‘स्पेसएक्स’च्या ‘फाल्कन-९’प्रक्षेपकाद्वारे यंदाच्या वर्षातील दुसऱ्या तिमाहीत ‘जीसॅट-२०’चे प्रक्षेपण फ्लोरिडातून करणार आहे. उच्च क्षमतेचा हा दूरसंचार उपग्रह पूर्णपणे स्वदेशी आहे. त्याची निर्मिती व त्यासाठीचा निधी आणि कार्यचालन ‘एनएसआयएल’ने केले आहे.

ISRO-SpaceX Mission
ISRO XPoSat Launch : नववर्षाची धमाक्यात सुरुवात! 'एक्सपोसॅट' मोहिमेचं यशस्वी उड्डाण; पाहा व्हिडिओ

‘‘इतर कोणताही प्रक्षेपक वेळेत उपलब्ध होत नसल्याने भारताला ‘स्पेसएक्स’शी मदत घ्यावी लागली आहे,’’ असे ‘इस्रो’चे अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी सांगितले. ‘एनएसआयएएल’ने या संभाव्य उड्डाणासाठी ‘स्पेसएक्स’शी करार केला आहे. मोठे उपग्रह सोडण्यासाठी भारत आतापर्यंत फ्रान्सच्या ‘एरियनस्पेस’ या समूहावर अवलंबून राहावे लागत होते. ‘स्पेसएक्स’च्या रूपाने भारताला आता नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com