Solar Flares Images : सूर्याचे 'हे' फोटो तुम्हाला करतील थक्क, Aditya-L1ने पाठवली सौर ज्वालांची अप्रतिम छायाचित्रे

Aditya-L1 Solar Flares Images : गेल्या वर्षी झाले होते Aditya-L1चे प्रक्षेपण
Aditya-L1 Monitors Solar Activity from Lagrange Point L1
Aditya-L1 Monitors Solar Activity from Lagrange Point L1esakal

ISRO : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘आदित्य-एल १’ अंतराळयानाच्या दोन रिमोट सेन्सिंग उपकरणांनी सौरज्वाळांचे छायाचित्र काढले आहे, अशी माहिती संस्थेने सोमवारी दिली.

भारताची पहिले सौरयान ‘आदित्य- एल १’ या वर्षी सहा जानेवारीला लॅग्रिंयन बिंदू (एल वन) वर पोहोचले. याचे प्रक्षेपण २ सप्टेंबर २०२३ रोजी झाले होते. ‘एल-वन’ बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. तेथून सूर्याच्या हालचालींवर कायम लक्ष ठेवण्यास यान सक्षम आहे.

सूर्याच्या मे महिन्यातील सूर्याच्या गतिमान हालचाली यानावरील ‘सोलर अल्ट्रा व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (सूट) आणि व्हिजिबल इमिशन लाइन कोरोनाग्राफ (व्हीईएलसी) या उपकरणांनी टिपल्या आहेत, असे ‘इस्रो’ने निवेदनात म्हटले.

Aditya-L1 Monitors Solar Activity from Lagrange Point L1
Pacific Ocean Species: पॅसिफिक समुद्राच्या तळाशी सापडलाय 'हा' आगळा वेगळा जीव; संशोधक देखील हैराण,काय आहे वेगळेपण जाणून घ्या

भूचुंबकीय वादळाची नोंद

गेल्या महिन्यात ८ ते १५ मे या कालावधीत परिभ्रमणाच्यावेळी सूर्यावरील ‘एआर १३६६४’ हा सक्रिय भाग भागावर ‘कोरोनल मास इजेक्शन’संबंधीत ‘एक्स -क्लास’ आणि ‘एम-क्लास’ यावर्गातील सौरज्वाळा दिसून आल्या.

Aditya-L1 Monitors Solar Activity from Lagrange Point L1
Gpay Close News : असं काय झालं की कंपनीने घेतला Gpay बंद करण्याचा निर्णय; प्लेस्टोअरवरून ऍप गायब

त्याचप्रमाणे भूचुंबकीय वादळांची नोंद झाली आहे. या हालचाली पूर्ण झाल्यानंतर १४ मे रोजी ‘सूट’ आणि ‘व्हीईएलसी’ झरोके उघडण्यात आले होते. ‘सूट’ने १७ मे रोजी मिळवलेल्या सूर्याच्या प्रतिमा ‘इस्रो’ने प्रसिद्ध केल्या आहेत. ‘व्हीईएलसी’च्या निरीक्षणांचे तपशीलही शेअर केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com