
itel Magic X Pro Launched: आइटेलने भारतात आपला नवीन फीचर फोन लाँच केला आहे. कंपनीने खूप किंमतीत itel Magic X Pro ला लाँच केले आहे. या फीचर फोनमध्ये हाय-स्पीड हॉटस्पॉट कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट मिळतो. याद्वारे एकाचवेळी ८ डिव्हाइसला कनेक्ट करू शकता. Magic X Series मधील Itel Magic X आणि Itel Magic X Play 4G VoLTE फीचर फोन देखील भारतात लाँच झाले आहे. itel Magic X Pro स्मार्टफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
itel Magic X Pro चे फीचर्स
itel Magic X Pro मध्ये ४जी VoLTE टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. यात २.४ इंच QVGA डिस्प्ले देण्यात आला असून, याचे डिझाइन शानदार आहे. फोनमध्ये ८ गेम आधीपासूनच इंस्टॉल आहेत. आयटेलच्या या फोनमध्ये VGA रियर कॅमेरा दिला आहे. तसेच, ड्यूल सिम कार्ड सपोर्ट मिळतो. itel Magic X Pro च्या खरेदीवर बॉक्समध्ये चार्जर आणि वायरलेस हेडसेट मिळेल. डिव्हाइस HD-इनेबल VoLTE कॉल आणि LetsChat चॅट ग्रुपसह येते. यात पॉवर बॅकअपसाठी २५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.
itel Magic X Pro सोबत तुम्ही ऑनलाइन गाणी ऐकण्याचा देखील आनंद घेऊ शकता. या फीचर फोनमध्ये FM Radio देखील दिला आहे. याशिवाय, फोनमध्ये आधीपासूनच काही गाणी देण्यात आली आहेत. Built-in BoomPlay द्वारे तुम्ही ७.४ कोटी गाणी सहज ऐकू शकता. itel Magic X Pro 4G फोनमध्ये १२ भारतीय भाषांचा सपोर्ट मिळतो. यात इंग्रजी, हिंदी, गुजराती, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, पंजाबी, बंगाली, उडिया, आसामी आणि उर्दू भाषेचा समावेश आहे.
itel Magic X Pro 4G ची किंमत
itel Magic X Pro 4G ची किंमत फक्त २,९९९ रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर तुम्हाला २ वर्षांची सर्व्हिस वॉरंटी मिळेल. फोनला ब्लॅक आणि ब्लू रंगात खरेदी करू शकता. फोनला ऑफलाइन आणि ऑनलाइन रिटेल स्टोरवरून खरेदी करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.