
जेम्स वेब टेलिस्कोपने अल्फा सेंटॉरी A भोवती गॅस जायंट ग्रह शोधला, जो राहण्यायोग्य क्षेत्रात आहे.
हा शोध बहु-तारा यंत्रणेतील ग्रहनिर्मितीच्या सिद्धांतांना आव्हान देतो.
भविष्यातील संशोधन या ग्रह आणि त्याच्या चंद्रांचा जैविक दृष्टिकोनातून अभ्यास करेल.
नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने (JWST) आपल्या सौरमालेच्या शेजारी असलेल्या अल्फा सेंटॉरी A ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एका मोठ्या ग्रहाचा शोध लावला आहे. पृथ्वीपासून अवघ्या चार प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या या ताऱ्याभोवती ग्रह शोधणे हा खगोलशास्त्रज्ञांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. अल्फा सेंटॉरी ही तिन ताऱ्यांची यंत्रणा आहे, ज्यात सूर्यासारखे अल्फा सेंटॉरी A आणि B, तसेच लाल बटू तारा प्रॉक्सिमा सेंटॉरी यांचा समावेश आहे. प्रॉक्सिमाभोवती तीन ग्रह आढळले असले, तरी सूर्यासारख्या ताऱ्यांभोवती ग्रह शोधणे आव्हानात्मक होते.