
जन्माष्टमी 2024 साठी 'हरे कृष्णा हरे रामा' आणि 'गोविंदा आला रे' सारख्या गाण्यांनी Instagram Reels बनवा.
दहीहंडी, राधा-कृष्ण नृत्य आणि माखन-मिश्री थीम्स वापरून रील्सला आकर्षक बनवा.
भक्तीपूर्ण आणि उत्साही गाण्यांनी रील्स बनवून जन्माष्टमीचा उत्साह सोशल मीडियावर पसरवा.
Janmashtami Trending Songs And Hashtags: हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमीला खास महत्व आहे. यंदा २६ ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा केला जातो. जन्माष्टमीनिमित्त अनेक लोक सोशल मिडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ, रिल्स शेअर करायचे असतात. तुम्हालाही तुमचे खास फोटो व्हायरल करायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीचे फोटो आणि व्हिडिओला अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याला जास्तीत जास्त लाइक्स कसे मिळेल याच्या काही सोप्या टिप्स देणार आहोत.