Japan Technology : जपानने घेतली 6G उपकरणाच्या प्रोटोटाईपची चाचणी; तब्बल 100 GBPS मिळतोय स्पीड.. संपूर्ण जग चकित!

6G Network Launch : 11 एप्रिलला करण्यात आली यशस्वी चाचणी ; 5G पेक्षा 20 पट जास्त स्पीडचे नेटवर्क
जपानने 6G नेटवर्क लाँच केले.
जपानने 6G नेटवर्क लाँच केले.

Japan 6G Network : आजवर लोकांनी 5G स्पीडचा अनुभव घेतला आहे, जिथे वापरकर्त्यांना हाय स्पीड इंटरनेट मिळते. आता जगातील पहिला 6G उपकरणाचा डिवाइसचा प्रोटोटाइप (6G Prototype) समोर आला आहे. या प्रोटोटाईपच्या चाचणीत इंटरनेटचा वेग हा 5G च्या तुलनेत 20 पट, म्हणजेच तब्बल 100 GBPS एवढा असल्याचं स्पष्ट झालं. जपानने हे 6G प्रोटोटाइप जगासमोर आणल्याने जागतिक स्तरावर वायरलेस नेटवर्कची स्पर्धा तीव्र झाली आहे.

यामुळे भारतासमोर देखील एक महत्वाचे आव्हान उभे राहिले असून, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताला आपल्या 6G रणनीतीचे पुनर्मूल्यांकन (reevaluation) करणे आवश्यक आहे.

जपानच्या दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज NTT, मोबाइल ऑपरेटर DOCOMO आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या NEC आणि फुजित्सु यांच्या संयुक्त प्रयत्नात बनवलेल्या या प्रोटोटाइपमध्ये 100 GHz आणि 300 GHz इतक्या हाय-फ्रीक्वेंसी बँडचा वापर करवण्यात आला आहे. हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे. यामुळे एकाच वेळी अनेक हाय-डेफिनिशन चित्रपटांची स्ट्रीमिंग करता येईल.

दक्षिण कोरिया, चीन, तसेच उत्तर अमेरिका आणि अनेक युरोपीय देश देखील 6G क्षेत्रात महत्वाकांक्षी उपक्रमांवर काम करत आहेत.

भारताची स्थिती काय आहे?

भारतीय सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन (COAI) चे महानिदेशक लेफ्टनंट जनरल डॉ. एसपी कोचर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, “आघाडीवर असलेले देश सुरुवातीला चांगले परिणाम दाखवू शकतात, परंतु त्यांचे परिणाम (best results) आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असतील, तर त्याचा फायदा जगभरातील सर्व देशांना होणार नाही. मात्र, हे परिणाम जागतिक मानकांनुसार नसतील तर ते फक्त प्रदर्शनापुरते राहतील आणि व्यावसायिकदृष्ट्या वापरता येणार नाही."

जपानने 6G नेटवर्क लाँच केले.
Nashik Fraud Crime : जपान टूरच्या नावाखाली घातला 8 लाखांचा गंडा! पूर्वा हॉलिडेज टूरच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल

भारत सरकारने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेले 'भारत 6G व्हिजन' हे दस्तावेज आंतरराष्ट्रीय मानकांसह रोडमॅप तयार करण्यावर भर देतो. या दस्तावेजात भारताच्या संदर्भात नवीन शक्यता तयार करण्यासाठी जगभरात राबवल्या जाणाऱ्या प्रमुख संशोधन मार्गांची ओळख करून देण्यात आली आहे.

COAI चे DG असे मानतात की 6G नेटवर्क वापरून कोणते प्रयोग चांगले चालतील याची ओळख पटवून देणे हे सर्वात महत्वाचे आहे.

जपानने 6G नेटवर्क लाँच केले.
Neuralink : न्यूरालिंक प्रोजेक्ट धोक्यात? रुग्णाच्या मेंदूत बसवलेल्या चिपमध्ये तांत्रिक अडचणी.. इलॉन मस्कच्या कंपनीने दिली माहिती

6G व्हिजन दस्तावेजामध्ये मांडलेल्या रोडमॅपमध्ये अति-संयोजकता आणि आधुनिक अनुभवांमुळे (latest experiences) सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे भविष्य दिसते. यात नवीन स्पेक्ट्रम बँड शोधणे, AI आणि मशीन लर्निंगचा वापर करणे, अंतराळ आधारित संपत्तींचा समावेश करणे आणि नवीन युजर इंटरफेस विकसित करणे यांचा समावेश आहे.

या दस्तावेजात असेही म्हटले आहे की भारताचे स्वतःचे 6G डिझाईन करण्याचे स्वप्न आहे. तसेच, 6G चा व्यावसायिक वापर 2030 पर्यंत होईल असा डॉ. कोचर यांचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com