
भारतीय खगोलशास्त्र आणि विज्ञान साहित्याच्या क्षेत्रातील दिग्गज, डॉ. जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक विश्वात शोककळा पसरली आहे. विश्वनिर्मिती, गुरुत्वाकर्षण आणि खगोलशास्त्रातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्याचबरोबर त्यांनी सामान्य माणसांसाठी विज्ञान सोप्या भाषेत मांडले, ज्यामुळे त्यांचे विचार घराघरात पोहोचले. त्यांच्या एका मुलाखतीत विचारला गेलेला प्रश्न आजही चर्चेचा विषय आहे.