Jio 5G : जिओचे सर्वात मोठं लाँचिंग; सांगली, कोल्हापूरसह 'या' ठिकाणी सुरू झाली 5G सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio True 5G

Jio 5G : जिओचे सर्वात मोठं लाँचिंग; सांगली, कोल्हापूरसह 'या' ठिकाणी सुरू झाली 5G सेवा

5G सेवांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लॉन्चमध्ये रिलायन्स जिओने मंगळवारी 50 शहरांमध्ये Jio True 5G सेवा सुरू केली आहे. या लाँचिंगसह Jio 5G सेवा देशातील 184 शहरांमध्ये उपलब्ध झाली आहे.

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात 5G सेवांच्या रोलआउट्सपैकी ही एक सर्वात मोठी सेवा असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण भारतात ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

या ठिकाणी सुरू झाली Jio 5G सेवा

आजपासून लाँच करण्यात आलेली 5G सेवा आंध्र प्रदेशातील चित्तूर, कडप्पा, नरसरावपेट, ओंगोले, राजमहेंद्रवरम, श्रीकाकुलम, विझियानगरम, आसाममधील नागाव, बिलासपूर, कोरबा, राजनांदगाव, पणजी, अंबाला, बहादूरगड, हिसार, कर्नाल, पानिपत, रोहतक, सिरसा, सोनीपत, धनबाद, बागलकोट, चिक्कमगलुरू, हसन, मंड्या, तुमाकुरू, अलप्पुझा, कोल्हापूर, नांदेड-वाघाळा, सांगली, बालासोर, बारीपाडा, भद्रक, झारसुगुडा, पुरी, संबलपूर, पुद्दुचेरी, अमृतसर, बिकानेर, कोटा, धर्मपुरी, इरोड, थुथुकुडी, नलगोंडा, झाशी, अलिगढ, मुरादाबाद, सहारनपूर, आसनसोल, दुर्गापूर आदी शहरे आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेस आहे.