Jio 5G Services in Pune: प्रतिक्षा संपली!पुण्यातही सुरू झाली Jio 5G सेवा, जाणून घ्या ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio 5G Services in pune jio launches 5g services in pune after hyderabad and bengaluru

Jio 5G Services in Pune : प्रतिक्षा संपली!पुण्यातही सुरू झाली Jio 5G सेवा, जाणून घ्या ऑफर

Jio 5G Services in Pune : रिलायन्स जिओ देशातील शहरांमध्ये वेगाने 5G इंटरनेट सेवा सुरू करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जिओने हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये 5G सेवा सुरू केली. आता पुण्यातही 23 नोव्हेंबरपासून 5G इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. जिओ आपल्या ग्राहकांना 1Gbps स्पीडसह वेलकम ऑफर देत आहे.

ऑक्टोबर 2022 पासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल आता एकूण 17 शहरांमध्ये 5G इंटरनेट पुरवत आहेत. तर, सुमारे डझनभर शहरांमध्ये चाचणी सुरू आहे. दोन्ही कंपन्या 4G किमतीसह 5G इंटरनेट सेवा देत आहेत.

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

पुण्यात 5G इंटरनेट सुरू

रिलायन्स जिओने 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात 5G इंटरनेट सुरू केले आहे. जिओ पुण्यातील ग्राहकांना 1Gbps च्या डेटा स्पीडसह वेलकम ऑफर देत आहे. जिओच्या ऑफरनुसार, या स्पीडसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही. 5G सेवांची सुविधा 4G प्लॅनच्या किमतीत दिली जात आहे.

जिओचे 5G 9 शहरांमध्ये सुरू

पुण्यात 5G सुरू करण्यापूर्वी, Jio ने 11 नोव्हेंबर रोजी हैदराबाद आणि बेंगळुरू शहरांमध्ये 5G इंटरनेट सुविधा सुरू केली. जिओची 5G सेवा आता देशातील एकूण 9 शहरांमध्ये पोहोचली आहे. यापूर्वी जिओने मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, वाराणसी आणि नाथद्वारा या 6 शहरांमध्ये 5G इंटरनेट सुरू केले होते.

हेही वाचा: Sharad Pawar: राष्ट्रवादी शिवरायांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळते, कारण…; भाजपचा शरद पवारांवर निशाणा

5G सेवांचा वेगवान विस्तार

रिलायन्स जिओने 5G सेवांसाठी मायक्रोसॉफ्ट, क्वालकॉम, इंटेल यासह अनेक मोठ्या कंपन्यांशी करार केला आहे. त्याच वेळी, Jio 5G सेवांच्या विस्तारासाठी आर्थिक वर्ष 2025 पर्यंत $9.1 बिलियन इतका खर्च करणार आहे. इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओने सरकारकडून सर्वाधिक 5G स्पेक्ट्रम अधिकार विकत घेतले आहेत.

हेही वाचा: UP Politics : नादच खुळा! 'I Love U Dimpal Bhabhi' अंगावर लिहून कार्यकर्त्याचा सायकलने 700 किमी प्रवास

टॅग्स :Jio5g networkreliance jio