Jio Vs Airtel Vs VI : 84 दिवसांचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, किमतीही बजेटमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio, Airtel,  Vi, and bsnl

Jio Vs Airtel Vs VI : हे आहेत 84 दिवसांचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

Jio Vs Airtel Vs VI Prepaid Plans : कमी व्हॅलिडिटीचे रिचार्ज काही जणांसाठी त्रासदायक ठरु शकतात, प्रत्येकाला कमी किंमतीत जास्त दिवस चालणारा रिचार्ज प्लॅन हवा असतो, त्यामध्ये 84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन हा बेस्ट मानला जातो. यामध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हे वार्षिक प्लॅनप्रमाणे तुमच्या खिशावर भार टाकत नाहीत. तसेच, या प्लॅनमध्ये चांगली व्हॅलिडिटी देखील मिळते. Jio, Airtel, BSNL आणि Vodafone-Idea च्या अशाच रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊ या, ज्यांची वैधता 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, मेसेजिंग आणि मोफत एसएमएस देखील उपलब्ध आहेत.

जिओ (jio) चा 385 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा 385 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये संपूर्ण कालावधीसाठी 6 GB कमाल डेटा उपलब्ध आहे. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 1,000 आउटगोइंग मेसेज दिले आहेत. डेटा मर्यादा संपल्यानंतर, गती 64Kbps पर्यंत कमी होते. या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

एअरटेल (Airtel) चा 455 रुपयांचा प्लॅन

भारती एअरटेलच्या 455 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये 6 GB हाय-स्पीड डेटा इंटरनेट देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. हा प्लॅन 900 मोफत आउटगोइंग एसएमएससह येतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, वापरकर्त्याकडून प्रति एमबी 50 पैसे आकारले जातील. या प्लॅनमध्ये एक महिना मोफत Amazon Prime Video मोबाइल सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. तसेच, विंक म्युझिकची फ्री सदस्यता मिळते.

हेही वाचा: भारतीय सैन्यात नोकरीची संधी, 10वी, 12वी पास करू शकतात अर्ज

Vodafone-Idea चा 459 रुपयांचा प्लॅन

Vodafone-Idea चा 459 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये 6 GB डेटा पॅक देण्यात आला आहे. तसेच अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, 1000SM सुविधा उपलब्ध आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत घसरते.

बीएसएनएल (BSNL) चा 429 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलचा 429 रुपयांचा प्लॅन 81 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा दिला जातो. म्हणजे एकूण 91GB डेटा मिळेल. याशिवाय, फोन अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस ऑफर करतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 40Kbps पर्यंत खाली येईल. BSNL च्या 429 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोफत EROS NOW सेवेचा आनंद घेता येईल.

हेही वाचा: Jobs : दहावी व ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; पाहा डिटेल्स

Web Title: Jio Airtel Vi And Bsnl Affordable Prepaid Plan With 84 Days Validity Check Price And Benefits

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..