Best Plans: 200 रुपयांपेक्षा कमी रुपयांचे रिचार्ज ; मिळणार 42 GB पर्यंत डेटा आणि कॉलिंग

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 21 October 2020

देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि Vi त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या आकर्षक ऑफर देत आहे

नवी दिल्ली: देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि Vi त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या आकर्षक ऑफर देत आहे. सध्याच्या काळात बरेच युजर्स कमीत कमी किंमतीत डेटा आणि कॉलिंग प्लॅन शोधत असतात. आज आपण तिन्ही कंपन्यांसाठी 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सर्वोत्तम प्रीपेड प्लॅनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये युजर्सना 42 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळण्याचाही एक प्लॅन आहे.

1. जिओचा 149 रुपयांचा प्लॅन-
रिलायन्स जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनला 24 दिवसांची वॅलिडिटी मिळणार आहे. या रिचार्जवर दररोज 1 जीबी डेटा मिळतो. अशा प्रकारे युजर्स एकूण 24 जीबी डेटा वापरू शकतो. या रिचार्जमध्ये जिओ नेटवर्कवरून जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी 300 नॉन-जिओ मिनिटे देण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, युजर्सना दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

Yahoo: याहू युजर्ससाठी वाईट बातमी, कंपनीने घेतला मोठा निर्णय

जिओचा 199 प्लॅन-
रिलायन्स जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वॅलिडिटी आणि रोज 1.5 GB डेटा मिळणार आहे. यामध्ये युजर्सला जास्तीत जास्त 42 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असणार आहे. तसेच जिओकडून इतर नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी 1000 नॉन-जिओ मिनिटे मिळतात. याशिवाय युजर्सना दररोज 100 एसएमएस आणि जिओ ऍप्सचे सबस्क्रिप्शन देण्यात आले आहे.

एअरटेलचा 149 प्लॅन-
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वॅलिडिटी देण्यात आली आहे. यामध्ये फक्त 2 जीबी डेटा आहे जो तुम्ही केव्हाही वापरू शकता. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण 300 एसएमएस देण्यात आले आहेत. तसेच एअरटेल Xstream, विंक म्युझिक आणि मोफत हॅलोटुन्सचे सबस्क्रिप्शन मोफत मिळते.

Vivo Navratri Offer: विवो स्मार्टफोनच्या खरेदीवर भन्नाट ऑफर

Vi चा 149 रुपयांचा प्लॅन-
व्होडाफोन-आयडियाच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह एकूण 3 जीबी डेटा मिळतो. यामध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएस दिले जातात. याशिवाय Vi मुव्हीस आणि टीव्ही सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहेत.

Vi चा 199 रुपयांचा प्लॅन -
व्होडाफोन-आयडियाच्या 199 रुपयांच्या प्लॅनला 24 दिवसांच्या वॅलिडिटीसह दररोज 1 जीबी डेटा मिळतो. यामध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय मुव्हीस आणि टीव्ही सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jio Airtel vi best plans below 200 gives unlimited data and calling