Jio चे जबरदस्त डेटा प्लॅन्स; मिळेल 365GB डेटा आणि बरेच काही | Jio Data Plans | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio

Jio चे जबरदस्त डेटा प्लॅन्स; मिळेल 365GB डेटा आणि बरेच काही

रिलायन्स जिओद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर केले जातात. परंतु अलीकडे जिओने No Daily Limit कॅटेगरी प्लॅन सादर केले आहेत, या प्लॅनमध्ये कोणत्याही डेली लिमीटशिवाय सर्व प्लॅन देण्यात आले आहेत. म्हणजे वापरकर्ते त्यांना देण्यात आलेला सर्व डेटा एकाच दिवसात वापरू शकतात. या श्रेणीतील सर्वाधिक डेटा असलेला प्लॅन हा 365 GB डेटासह येतो. चला तर मय या प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊया-

Jio चा 365GB डेटा प्लॅन

या प्लॅनची किंमत 2,397 रुपये असून या प्लॅनमध्ये 365GB डेटा देण्यात आला आहे. त्याची वैधता एक वर्ष म्हणजे 365 दिवस आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, जिओ टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन, जिओसिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओक्लाउडसह दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनची खासियत म्हणजे तुम्ही एका दिवसात 365 GB पर्यंत डेटा वापरू शकता.

Jio चा 75GB डेटा प्लॅन

Jio च्या 75 GB नो डेटा लिमीट प्लॅनची किंमत 597 रुपये असून यामध्ये जास्तीत जास्त 75 जीबी डेटा देण्यात येतो. यासोबतच या प्लॅनमध्ये जिओ ओटीटी, मोफत ओटीटी अॅप्स सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस देण्यात आले आहेत. हा प्लॅन 90 दिवसांच्या म्हणजेच 3 महिन्यांच्या वैधतेसह येतो.

हेही वाचा: गुगलने बॅन केले 'हे' 7 Android अ‍ॅप्स; फोनमधून लगेच करा डिलीट

Jio चा 50GB डेटा प्लॅन

जिओचा 50 जीबी डेटा प्लॅन 447 रुपयांमध्ये येतो. या प्लॅनची ​​वैधता ६० दिवस म्हणजे दोन महिने आहे. यामध्ये डेटासोबत अमर्यादित कॉलिंग, मेसेजिंग आणि OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देतो.

Jio चा 25GB डेटा प्लॅन

जिओचा 25GB डेटा प्लॅन 247 रुपयांमध्ये येतो. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. ज्यामध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह मेसेजिंग आणि ओटीटी अॅप्सचीही सुविधा देण्यात येते.

Jio चा 12GB डेटा प्लान

जिओचा 12GB डेटा प्लॅन 127 रुपयांमध्ये येतो. या प्लॅनमध्ये देखील अमर्यादित कॉलिंगसह, फ्री मॅसेजींग आणि फ्री OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

हेही वाचा: महिंद्राची कार खरेदीचा विचार करताय? कंपनी देतेय 'या' खास ऑफर

loading image
go to top