Recharge Plan: Jio चा सर्वात जबरदस्त प्लॅन, एकाच रिचार्जमध्ये ३३६ दिवसांची वैधता; पाहा बेनिफिट्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best Mobile Recharge Plan

Best Recharge Plan: Jio चा सर्वात जबरदस्त प्लॅन, एकाच रिचार्जमध्ये ३३६ दिवसांची वैधता; पाहा बेनिफिट्स

Best Mobile Recharge Plan: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Jio कडे कमी किंमतीत येणारे एकापेक्षा एक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनी अवघ्या १५ दिवसांपासून ते ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स ऑफर करते.

तुम्ही जर जास्त दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लॅन शोधत असाल तर कंपनीकडे एक चांगला रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे.

Jio कडे ३३६ दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा, कॉलिंगसह अनेक फायदे मिळतील. जिओच्या या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Auto Expo 2023: भारतीय कंपनी सादर करणार जगातील पहिली सेल्फ-बॅलेन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा डिटेल्स

Jio चा १,५५९ रुपयांचा प्लॅन

Jio कडे १,५५९ रुपये किंमतीचा शानदार रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता ३३६ दिवस आहे. यामध्ये तुम्हाला एकूण २४ जीबी डेटा मिळतो. हा डेटा तुम्ही पूर्ण कालावधी दरम्यान कधीही वापरू शकता. डेटा समाप्त झाल्यास ६४Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता.

या रिचार्ज प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगसह एकूण ३६०० एसएमएस दिले जातात. एवढेच नाही तर तुम्ही ५जी डेटा देखील वापरू शकता.

तुमच्या शहरात Jio 5G सर्व्हिस सुरू झाली असल्यास व तुमच्याकडे ५जी फोन असल्यास हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा घेऊ शकता. ५जी डेटाचा फायदा घेण्यासाठी Jio Welcome Offer मध्ये सहभागी व्हावे लागेल.

हेही वाचा: Fitness Apps: जिमला जायचा कंटाळा येतो? 'हे' लोकप्रिय अ‍ॅप्स डाउनलोड करून घरीच करा व्यायाम

तसेच, या रिचार्जवर जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस देखील मिळेल.

दरम्यान, जिओकडे ३९५ रुपये आणि १५५ रुपये किंमतीचे रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता क्रमशः ८४ दिवस आणि २८ दिवस आहे. ३९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ६ जीबी डेटा दिला जातो. तर १५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा मिळेल.

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

टॅग्स :Jiorechargemega recharge