Jio Prepaid Plan
Jio Prepaid Plan

Jio चे दोन नवीन WFH प्लॅन, दररोज 2.5GB डेटासह मिळतील 'हे' फायदे

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Jio) ने दीर्घ वैधतेचे दोन नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही प्री-पेड प्लॅन दीर्घ वैधतेसह येतात. तुम्हाला हे दोन्ही रिचार्ज प्लॅन परवडणाऱ्या किंमतीत मिळतात तसेच या प्लॅन्समध्ये 912 GB पर्यंत हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. या दोन्ही प्लॅनची ​​वैधता एक वर्ष म्हणजेच 365 दिवस आहे. हे दोन्ही प्लॅन 'वर्क फ्रॉम होम' कॅटेगरीमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत.

जिओचा 2,878 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओने 2,878 रुपयांचा एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची ​​वैधता एक वर्ष म्हणजेच 365 दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB हायस्पीड डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजे या प्लॅनमध्ये एकूण 730GB हायस्पीड इंटरनेट डेटा दिला जात आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर, रिलायन्स जिओच्या 2,878 रुपयांच्या प्लॅनचा डेटा स्पीड 64Kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये एसएमएस आणि ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

Jio Prepaid Plan
मुलगा-नातवंडांना जीवंत जाळलं; मिठी मारलेल्या स्थितीत आढळले मृतदेह

रिलायन्स जिओचा 2998 रुपयांचा प्लॅन

Relinace Jio ने 2,998 रुपयांचा एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. हा नवीन प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो, म्हणजे एक वर्ष. या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB हायस्पीड डेटा दिला जात आहे. तथापि, डेटा मर्यादा संपल्यानंतर, वेग 64Kbps पर्यंत घसरतो. रोजच्या 2.5GB डेटानुसार या प्लॅनमध्ये एकूण 912.5GB डेटा दिला जात आहे.

Jio Prepaid Plan
रेडमीचा स्वस्त स्मार्टफोन लॉंच; मिळेल 50MP कॅमेरा, फास्ट चार्जिंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com