Jio App: आता टिकटॉकला टक्कर देणार भारतीय अ‍ॅप, जिओ लाँच करणार शॉर्ट व्हीडिओ प्लॅटफॉर्म

Jio लवकरच आपल्या शॉर्ट व्हीडिओ प्लॅटफॉर्मला लाँच करणार आहे. हे अ‍ॅप टिकटॉक, इंस्टाग्राम रिल्स सारख्या प्लॅटफॉर्म्सला टक्कर देईल.
Jio Short Video App
Jio Short Video AppSakal
Updated on

Jio Platfom: गेल्याकाही वर्षात शॉर्ट व्हीडिओ अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शॉर्ट व्हीडिओ अ‍ॅप टिकटॉकवर भारतात बंदी घातल्यानंतर अनेक कंपन्यांनी स्वतःचे प्लॅटफॉर्म्स लाँच केले आहेत. इंस्टाग्राम रील्स आणि युट्यूब शॉर्ट्सची लोकप्रियता देखील वाढली आहे. हीच वाढती लोकप्रियता पाहता आता Jio देखील शॉर्ट व्हीडिओ अ‍ॅपला लाँच करणार आहे.

रिपोर्टनुसार, जिओच्या या अ‍ॅपचे नाव Platfom असण्याची शक्यता आहे. Platfom अ‍ॅपसाठी जिओने रोलिंग स्टोन इंडिया आणि Creativeland आशिया यांच्याशी भागीदारी केली आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Platfom अ‍ॅप हे पेड अल्गोरिद्मवर काम करणार नाही, असे सांगितले जात आहे. कंपनीचा उद्देश अ‍ॅपद्वारे चांगल्या टॅलेंटला जगासमोर आणणे हा आहे. प्लॅटफॉर्मवर यूजर्सला लोकप्रियतेच्या आधारावर सिल्वर, ब्लू आणि रेड टिक मिळेल. क्रिएटर्सच्या प्रोफाइलसह बुक नाउ बटन असेल, ज्याद्वारे फॅन्स क्रिएटर्सशी जोडले जाऊ शकतात. जिओच्या या प्लॅटफॉर्मवर मोनेटाइजेशनचा देखील पर्याय मिळेल.

Jio Short Video App
Amazon Sale: 'या' डिव्हाइसवर मिळतेय भरघोस सूट, सुरुवाती किंमत फक्त ५९९ रुपये; पाहा लिस्ट

नवीन अ‍ॅपसह जिओकडून फाउंडिंग मेंबर प्रोग्राम देखील सादर केला जाईल. या अंतर्गत १०० फाउंडिंग मेंबरला इनव्हाइट ओनली आधारावर अ‍ॅक्सेस मिळेल. अशा यूजर्सला गोल्डन टिक मिळेल. हे मेंबर्स नवीन आर्टिस्ट अथवा क्रिएटरला इनव्हाइट देखील करू शकतात. कंपनी आपल्या या शॉर्ट व्हीडिओ प्लॅटफॉर्मला पुढील वर्षी लाँच करण्याची शक्यता आहे. या प्लॅटफॉर्मवर गायक, डान्सर, फॅशन डिझाइन सारखे इनफ्लूएंसर सहभागी होऊ शकतात.

नवीन प्रोडक्टच्या लाँचिंगबाबत माहिती देताना Jio Platforms चे सीईओ किरण थॉमस म्हणाले की, 'जिओ प्लॅटफॉर्म्सवर आमचा उद्देश डेटा, डिजिटल आणि अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा उपयोग करून आमच्या ग्राहकांसाठी नवीन अनुभव निर्माण करणे हा आहे. आरआयएल समूहाचा भाग म्हणून आम्ही टेलिकॉम, मीडिया, रिटेल, मॅन्यूफॅक्चरिंग, वित्तीय सेवा, शिक्षण आणि आरोग्य सेवांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील प्लॅटफॉर्म्स तयार केले आहेत. आम्ही या नवीन प्लॅटफॉर्मसाठी रोलिंग स्टोन इंडिया आणि क्रिएटिव्हलँड आशिया यांच्याशी भागीदारी केली आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com