Jio Network : ‘जिओ’ देशातील सर्वांत वेगवान नेटवर्क; ‘ओकला स्पीडटेस्ट’मध्ये पटकावले नऊ पुरस्कार!

देशातील एकूण फाइव्ह-जी नेटवर्कपैकी ८५ टक्के नेटवर्क जिओने तैनात केले आहे.
Jio Network
Jio NetworkeSakal

रिलायन्स जिओने देशातील सर्वांत वेगवान आणि सर्वोत्कृष्ट नेटवर्कचा मान पटकावला आहे. जागतिक कनेक्टिव्हिटी इंटेलिजन्स एजन्सी ओकला स्पीडटेस्टमध्ये सर्व नऊ पुरस्कार ‘जिओ’ने मिळवले. देशात सर्वांत वेगवान फाइव्ह-जी नेटवर्क उपलब्ध करण्यातही जिओने आघाडी घेतली असून, देशातील एकूण फाइव्ह-जी नेटवर्कपैकी ८५ टक्के नेटवर्क जिओने तैनात केले आहे.

हे पुरस्कार २०२३ च्या दोन तिमाहींमधील नेटवर्कच्या कामगिरीच्या आधारावर देण्यात आले. ‘जिओ’ने फास्टेस्ट मोबाइल नेटवर्क, बेस्ट मोबाइल कव्हरेज, बेस्ट मोबाइल नेटवर्क, बेस्ट मोबाइल गेमिंग एक्सपिरियन्स, बेस्ट मोबाइल व्हिडिओ एक्सपिरियन्स, टॉप रेट केलेले मोबाइल नेटवर्क, फास्टेस्ट फाइव्ह-जी मोबाइल नेटवर्क, बेस्ट फाइव्ह-जी मोबाइल गेमिंग एक्सपिरियन्स आणि बेस्ट फाइव्ह-जी मोबाइल व्हिडीओ एक्सपिरियन्स या श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले.

Jio Network
Jio Fibre: एका महिन्यासाठी जिओचा वायफाय एकदम फ्री, फक्त करावा लागेल 'इतक्या' रुपयांचा रिचार्ज

‘जिओ’च्या या कामगिरीबाबत बोलताना कंपनीचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले, ‘‘ देशात डिजिटल समाज निर्माण करण्यासाठी आवश्यक इंटरनेट क्रांतीत जिओचे योगदान मोलाचे ठरले आहे, ही बाब आमच्यासाठी गौरवास्पद आहे. ‘जिओ’ने ज्या गतीने फाइव्ह-जी आणले आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही दर दहा सेकंदाला फाइव्ह-जी सेल तैनात करत आहोत.’’

‘‘आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आपल्या ग्राहकांना स्पीड, व्हिडीओ आणि गेमिंगचा सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी जिओचे प्रयत्न उत्तम आहेत, ’’ असे ओकलाचे अध्यक्ष आणि सीईओ स्टीफन बाय यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com