जुगाडू जोसेफ...

वृत्तसंस्था
Thursday, 4 January 2018

सध्या सोशल मिडियावर जूगाड करुन तयार केलेल्या मशीन्सचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ही सर्व मशीन्स जोसेफ हर्सचर या तरुणाने बनविली आहेत. याला 'केमिकल चेन मशिन्स' म्हणतात.  

वयाच्या सहाव्या वर्षीच जोसेफने चॉकलेट ठेवण्यासाठी पहिले मशिन बनवले. त्यानंतर त्याला जुगाड करून वेगवेगळी मशिन बनवायचा छंद जडला. वयाच्या बाविसाव्या वर्षी जोसेफने मित्रांसाठी चहा ओतणारे मशीन बनवले.

आता अशा प्रकारची मशिन्स बनवणे त्याचा पूर्णवेळ व्यवसाय आहे. काही जाहिरातींसाठी, ऍनिमेशन फिल्मसाठी अशा प्रकारची मशिन्स तो डिझाईन करतो. तसेच लहान मुलांसाठी अशी मशिन्स बनविण्याच्या कार्यशाळा देखील तो घेत असतो.  

"मला ज्या ज्या गोष्टींचा त्रास होतो, तो त्रास थांबवण्यासाठी काय करता येईल, या विचारातून मला चालना मिळते," असे जोसेफ सांगतो.

व्हिडिओ सौजन्य - McColl Center youtube
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: josafe machine maker