esakal | फोनच्या सेटिंग्जमध्ये करा हे बदल अन् काढा बेस्ट फोटो, जाणून घ्या सविस्तर

बोलून बातमी शोधा

mobile photography
फोनच्या सेटिंग्जमध्ये करा हे बदल अन् काढा बेस्ट फोटो, जाणून घ्या सविस्तर
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

फोटोग्राफीसाठी बेस्ट असल्याच्या दाव्यासह सध्या शेकडो स्मार्टफोन बाजारात विकले जात आहेत. मात्र, या फोनने जेव्हा आपण फोटोग्राफी करता तेव्हा तेथे चांगले फोटो क्लिक होत नाहीत. स्मार्टफोन कंपन्यांद्वारे वापरकर्त्यांच्या सोयीसाठी बरेच कॅमेरा मोड देण्यात येतात, जे आपल्या फोनमध्ये प्री-सेट्स म्हणून दिलेले असतात. तसेच, मॅन्युअल सेटिंग्जसह फोटो क्लिक करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. वास्तविकता अशी आहे की स्मार्टफोन कंपन्या चांगले कॅमेरा फोन देऊ शकतात पण ते वापरुन आपल्याला चांगले फोटो मात्र तुम्हालाच क्लिक करावे लागतात. फोनमधे चांगले फोटो क्लिक करण्यासाठी काही कॅमेरा मोड वापरले पाहिजेत. आज आपण अशाच काही कॅमेरा मोड्सबद्दल जाणून घेणार आहोत.

Burst Mode - चालत्या कारचे फोटो क्लिक करण्यासाठी ब्रस्ट मोड चालू करावा. स्पोर्ट्स गेम किंवा फिरत्या ऑब्जेक्ट दरम्यान ब्रस्ट मोड चालू करावा लागते तेव्हाच अशा परिस्थितीत चांगले फोटो क्लिक केले जातात.

HDR Auto Mode - बहुतेक स्मार्टफोनमध्ये एचडीआर ऑटो मोड प्री-सेट मोडच्या रूपात उपलब्ध आहे. एचडीआर (हाय डायनॅमिक रेंज) ऑटो मोड चालू असतो तेव्हा, फोनचा कॅमेरा फोटो वेगळ्या पध्दतीने क्लिक करतो. त्यात अधिक vivid रंग येतात.

Viewfinder - प्रत्येक स्मार्टफोनमध्ये व्ह्यूफाइंडर असतो, जो स्मार्टफोनचे फोकस लॉक करतो. या मोडसह, आपल्या फोनच्या कॅमेर्‍यावरून स्पष्ट आणि उत्कृष्ट फोटो क्लिक केले जाऊ शकतात.

Grid Mode - ग्रिड मोड फोनच्या स्क्रीनला 3X3 ग्रिडमध्ये रुपांतरीत करतो. या दरम्यान, फोटो क्लिक करताना रूल ऑफ थर्ड वापरावा.

Exposure - एक्सपोजर मीटर मोड काही स्मार्टफोनमध्येच देण्यात येतो. याच्या मदतीने फोटोवर किती प्रकाश पाहिजे हे निश्चित केले जाऊ शकते.

Optical Zoom - फोनने फोटो क्लिक करताना शक्य असेल तर झूम वापरु नये,