काश्मीरची 'ही' 4 ठिकाणे पाहिलीत का? ज्याची सुंदरता स्वर्गापेक्षा कमी नाही

काश्मीरची 'ही' 4 ठिकाणे पाहिलीत का? ज्याची 
सुंदरता स्वर्गापेक्षा कमी नाही
Summary

असे म्हटले जाते की, जर पृथ्वीवर स्वर्ग असेल तर ते काश्मीरमध्ये आहे. जर तुम्ही पृथ्वीवरील या स्वर्गात सहलीचे नियोजन करत असाल तर या आश्चर्यकारक ठिकाणांना नक्की भेट द्या.

असे म्हटले जाते की, जर पृथ्वीवर स्वर्ग असेल तर ते काश्मीरमध्ये आहे. जर तुम्ही पृथ्वीवरील या स्वर्गात सहलीचे नियोजन करत असाल तर या आश्चर्यकारक ठिकाणांना नक्की भेट द्या.

हिरवीगार जंगले, दऱ्या खोऱ्यातून वाहणाऱ्या नद्या आणि त्यात बर्फाच्छादित पर्वतांची सावली. शिखरांवर मर्यादित अंतर असलेले घर आणि सुंदर रंगीबेरंगी फुलांची दूरवर पसरलेली चादर. हे चित्र नाही तर काश्मीरचे वर्णन आहे. काश्मीर केवळ पहलगाम, गुलमर्ग, युसमर्ग किंवा सोनमार्ग यासारख्या लोकप्रिय ठिकाणांसाठीच नव्हे तर काही दशकांपूर्वी पर्यटकांपासून लांब असलेल्या ठिकाणांसाठी देखील ओळखले जाते. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा सुंदर आणि थरारक ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जे अजूनही लोकांच्या गर्दीपासून दूर आहेत.

चटपाल गाव
चटपाल गाव

चटपाल गाव

श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग किंवा युसमर्गच्या सुंदर दृश्यांविषयी तुम्हाला माहिती असेल पण काश्मीरमधील चटपाल गावाच्या सौंदर्याचे वर्णन कोणीही केले नसेल. हे काश्मीरमधील सर्वात सुंदर ऑफबीट पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आहे. शहरी जीवनातील धकाधकीच्या जीवनापासून दूर निसर्गाच्या कुशीत कुटुंब आणि मित्रांसोबत काही महत्वाचा वेळ घालवण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. तसेच, चटपालच्या सभोवतालच्या जंगलात एक छोटा ट्रेक आहे, जो साहसी प्रेमींसाठी एक सुखद अनुभव असेल.

येथे जाण्यासाठी योग्य वेळ

काश्मीरमधील प्रत्येक हंगामाचे स्वतःचे आकर्षण असते. चटपालला भेट देण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम काळ आहे. हिवाळ्याच्या हंगामत तुमच्या सहलीत अडचणी येऊ शकतील. पण जर तुम्हाला हिमवर्षावाचा आनंद घ्यायचा असेल तर इथे येणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

कसे पोहोचायचे?

श्रीनगर विमानतळ हे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. येथून 90 किमी प्रवास करण्यासाठी तुम्ही टॅक्सी भाड्याने घेऊ शकता. तर रेल्वे स्टेशन जम्मू तवी हे येथील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

तुम्ही कुठे राहू शकता?

जर तुम्ही इथे राहण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही जम्मू -काश्मीरवर असलेला बंगला निवडू शकता. येथे तुम्हाला सर्व मूलभूत सुविधा मिळतील.

वारवान व्हॅली

जर तुम्हाला पर्यटकांनी गजबजलेल्या शहरांमध्ये जायचे नसेल तर वारवान व्हॅली तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण असू शकते. हे जम्मू -काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून 150 किमी आणि अनंतनाग जिल्ह्यापासून 3 तासांच्या अंतरावर आहे. भव्य धबधब्यांव्यतिरिक्त, विशाल देवदार झाडे वारवण खोऱ्याच्या आकर्षणाचे केंद्र आहेत, ज्यामुळे हे सुंदर वातावरण रमणीय बनते. ट्रेकर्ससाठी हा स्वर्ग आहे. ट्रेकिंग मार्ग पहलगाममधील शेषनाग, सुखनाई-चित्तारगुल-ऐश्मुक्कम आणि सुखनाई-कानितल-पनीखार अशा विविध ठिकाणी जातो.

येथे जाण्यासाठी योग्य वेळ

वारवान व्हॅली पर्यटकांना नेहमी उपलब्ध नसते. त्यामुळे पर्यटकांना केवळ जून ते ऑक्टोबर या महिन्यातच भेट देऊ शकतात. वारवान व्हॅलीला भेट देण्याचा उत्तम काळ जून ते ऑक्टोबर हाच आहे.

कसे पोहोचायचे?

येथे पोहोचण्यासाठी, तुम्हाला दक्षिण काश्मीरमधील कोकेरनाग येथून टॅक्सी घ्यावी लागेल आणि येथे पोहोचायला सुमारे 3 तास लागतील.

तुम्ही कुठे राहू शकता?

खोऱ्याजवळ एक इंशान गाव आहे. जिथे तुम्हाला काही अधिकृत निवास पर्याय मिळू शकतात. दुसरीकडे, हे अनंतनागपासून 3 तासांच्या अंतरावर असल्याने, तुम्ही परत अनंतनागला येऊन थांबू शकता.

गुरेझ गाव

गुरेझ हे उच्च उंचीवर वसलेले गाव आहे. जे सुमारे 2400 मीटर उंचीवर आहे. बांदीपूर पासून सुमारे 86 किमी आणि श्रीनगरपासून 123 किमी अंतरावर ही दरी बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेली आहे. खोऱ्यातून वाहणारी किशनगंगा नदीचे दृश्य डोळ्याला सुखद नजारा देऊन जाते. हे काश्मीरमधील पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण हिम बिबट्या आणि तपकिरी अस्वल सारख्या विदेशी वन्यजीवांच्या संवर्धनासाठी ओळखले जाते. याठिकाणी हिमवर्षावामुळे गुरेझ नोव्हेंबर ते मे पर्यंत संपूर्ण जगापासून अलिप्त आहे. यावेळी रझदान खिंडीत जोरदार बर्फवृष्टी होते. काश्मीरचा पर्यटन विभाग पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी गुरेझ हेलिकॉप्टर सेवा देखील देतो.

येथे जाण्यासाठी योग्य वेळ

हिवाळ्याच्या हंगामात येथे जाणे सुरक्षित नाही. जर तुम्हाला इथल्या दऱ्यांचा आनंद घ्यायचा असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात जाऊ शकता.

कसे पोहोचायचे?

उधमपूर किंवा श्रीनगर येथून सामायिक केलेली टॅक्सी किंवा बस गुरेझला जाण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. श्रीनगर विमानतळ हा गुरेझला हवाई मार्गाने जाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

तुम्ही कुठे राहू शकता?

जम्मू -काश्मीर पर्यटन विभागाने बांधलेला डाक बंगला गुरेझमध्ये राहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. याशिवाय इथे राहण्यासाठी इतर अनेक पर्याय आहेत.

भद्रवाह

जम्मू -काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील हिमालय पर्वताच्या पायथ्याशी वसलेले भद्रवाह हे निसर्गाच्या कुशीत वसलेले एक शांत निसर्गरम्य ठिकाण आहे. सापांच्या विविध प्रजातींचे घर असल्यामुळे याला 'सर्पांची जमीन' असेही म्हटले जाते. येथे असलेल्या एका दगडावर कोरलेल्या नागराज वासुकी मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता. जर तुम्हाला एडवेंचर आवडत असेल तर तुम्ही येथे पॅराग्लायडिंग, स्कीइंग, राफ्टिंग, रॉक क्लाइंबिंग, अँगलिंग आणि पर्वतारोहणाचा आनंद घेऊ शकता.

येथे जाण्यासाठी योग्य वेळ

हिवाळा हा भद्रवाहला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. कारण तो पर्यटकांना भरपूर रोमांचकारी अनूभव देऊन जातो.

कसे पोहोचायचे?

जम्मू विमानतळ हे भद्रवाहला जाण्यासाठी जवळचे विमानतळ आहे. भद्रवाहला जाण्यासाठी येथून सहज बस किंवा टॅक्सी मिळू शकते. जम्मू -तवी हा सर्वोत्तम रेल्वे पर्याय आहे. जम्मूपासून भद्रवाह फक्त 206 किमी अंतरावर आहे. तुम्ही इथे बसने सहज पोहोचू शकता. जम्मूहून भद्रवाहला जाण्यासाठी 6-7 तास आणि उधमपूरहून 5-6 तास लागतात

तुम्ही कुठे राहू शकता?

भद्रवाहमध्ये खाजगी आणि शासकीय निवास दोन्ही पर्याय आहेत. ज्यात बागवान गेस्ट हाऊस, टीआरसी भद्रवाह, विनर्स गेस्ट हाऊस अशी राहण्याची ठिकाणे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com