Kia Carens Launch :लवकरच येतेय Kia ची नवी न कार; वाचा काय असतील खास फीचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kia carens

लवकरच येतेय Kia ची नवी न कार; वाचा काय असतील खास फीचर्स

Kia Carens ची किंमत उद्या जाहीर केली जाणार असून या थ्री रो एमपीव्हीची अधिकृत एंट्रीही भारतात होणार आहे. MPV सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी एर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा यांना टक्कर देण्यासाठी Kia ने डिसेंबर 2021 मध्ये भारतात आपली चौथी कार Kia Carence सादर केली होती. दक्षिण कोरियाच्या कार निर्माता कंपनीने भारतात Kia Carens ची फीचर्स आणि ट्रिम्स आधीच उघड केली आहेत. आता 15 फेब्रुवारीला याच्या ट्रिमच्या किमतींची माहिती दिली जाईल.

Kia Carens चे बुकिंग 14 जानेवारीपासून सुरु झाले आहे. Kia ला Carence साठी 7738 पेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहेत. अनेक पॉवरट्रेन आणि सिटींग ऑप्शन्ससह प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस या पाच ट्रिम लेव्हलमध्ये कार ऑफर केल्या जातील.

फीचर्स काय मिळणार?

Kia Carens 10.25 इंच एचडी टचस्क्रीन नेव्हिगेशन, बोस साउंड सिस्टम, एअर प्युरिफायर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, दुसऱ्या रांगेतील सीट वन टच इझी इलेक्ट्रिक टंबल आणि सनरूफ यांसारख्या फीचर्ससह येते. Carens Kia Connect देखील उपलब्ध आहे जे नेव्हिगेशन, व्हेकल मॅनेजमेंट , सुरक्षिततेसह 66 कनेक्ट केलेल्या फीचर्सने सुसज्ज आहे. 66 कनेक्ट केलेल्या फीचर्समध्ये फायनल डेस्टीनेशन, सर्व्हर-आधारित रुटिंग गाईड, रिमोट सीट वेंटिलेशन कंट्रोल, प्रो-अॅक्टिव्ह व्हेकल स्टेटस यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

हेही वाचा: iPhone चे इतके चाहते का आहेत? असं काय आहे जे Android मध्ये नाही..

इंजिन

Kia Carens ला दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिनचा ऑप्शन मिळतो. ज्यामध्ये पहिले 1.5-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 115hp पॉवर आणि 144Nm टॉर्क जनरेट करते, तर दुसरे 1.4 टर्बो पेट्रोल इंजिन दिले गेले आहे, जे फक्त 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑफर केले जाईल. हे इंजिन 140hp पॉवर आणि 242Nm टॉर्क जनरेट करते. Kia Carense 7DCT आणि 6AT सह अनेक ट्रान्समिशन ऑप्शन्ससह येईल.

हेही वाचा: Maruti घेऊन येतेय पहिली इलेक्ट्रिक कार; किती असेल किंमत? वाचा

किंमत

Kia Carens आठ कलर ऑप्शन्समध्ये येईल ज्यात इम्पीरियल ब्लू, मॉस ब्राउन, स्पार्कलिंग सिल्व्हर, इंटेन्स रेड, अरोरा ब्लॅक पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, ग्लेशियर व्हाइट पर्ल आणि क्लियर व्हाइट यांचा समावेश आहे. दरम्यान Kia Carens ची किंमत 15 ते 20 लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: येतेय महिंद्राची इलेक्ट्रिक कार; आनंद महिंद्रांनी रिलीज केला टीझर

Web Title: Kia Carens Launch Everything You Need To Know About Kia Carens Ahead Of Its Launch

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Automobile