किआ ने लॉन्च केली Sonet X-Line; किंमत 13.39 लाख, जाणून घ्या फीचर्स

kia sonet xline launched in india prices start at rs 13.39 lakh check specs
kia sonet xline launched in india prices start at rs 13.39 lakh check specs

Kia India ने आज Kia Sonet X-Line भारतात 13.39 लाख (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च केली आहे. Sonet X लाइन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केली गेली आहे, ज्यामध्ये कॉस्मेटिक अपग्रेड्स देण्यात आले आहेत. Kia Sonet X-Line हे टॉप-स्पेक GTX+ व्हेरिएंटवर आधारित आहे, ज्यामुळे ती सब-फोर मीटर SUV सेगमेंटमध्ये मॅट फिनिश असलेले पहिले मॉडेल आहे.

फीचर्स

Kia Sonet X-Line ला 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, टायगर नोज ग्रिल, फ्रंट आणि रीअर स्किड प्लेट्स, ORVM, रिअर बंपर, ग्लॉस ब्लॅक एलिमेंट्स मिळतात. याशिवाय डार्क क्रोम फॉग लाइट गार्निश, डार्क हायपर मेटल अॅक्सेंट, सिल्व्हर ब्रेक कॅलिपर, शार्क-फिन अँटेनासाठी मॅट फिनिश यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

व्हेरिएंट्स आणि किंमत

Kia Sonnet X-Line ची किंमत Sonet X-Line 1.0 Turbo-Petrol DCT व्हेरिएंटसाठी 13.39 लाख रुपये आणि Sonet X-Line 1.5-लिटर डिझेल AT साठी 13.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

kia sonet xline launched in india prices start at rs 13.39 lakh check specs
Twitter Edit Feature : युजर्ससाठी मोठी बातमी, आता ट्विट होणार एडिट!

किआ इंडियाचे चीफ सेल्स ऑफिसर म्युंग-सिक सोहन म्हणाले, सॉनेट एक्स-लाइनसह, आम्ही आमचे डिझाइनिंग कौशल्य दाखवले आहे आणि एक स्टायलिश आणि वेगळी दिसणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही सादर केली आहे. कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये 32 टक्क्यांहून अधिक योगदानासह, सोनेटने या विभागात स्वतःला मजबूत केले आहे. आम्हाला खात्री आहे की Sonet X-Line या सणासुदीच्या हंगामात प्रीमियम आणि एक्सक्लूजीव्ह SUV चाहत्या लोकांमध्ये छाप पाडेल.

kia sonet xline launched in india prices start at rs 13.39 lakh check specs
मोठ्या प्रतीक्षेनंतर Sony चा नवा स्मार्टफोन लॉंच; मिळतो दमदार कॅमेरा, डिस्प्ले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com