Tesla Cybertruck : किम कार्दशीयनचा ५ वर्षांचा लेक चालवतो लाखोंचा टेस्ला सायबर ट्रक..! वाढदिवसानिमित्त मिळाले भन्नाट गिफ्ट

Tesla Cybertruck : हॉलिवूड अभिनेत्री आणि अमेरिकन इन्फ्लुएन्सर किम कार्देशीयनचा मुलगा त्याच्या अनोख्या गिफ्टमुळे चर्चेत आला आहे.
Tesla Cybertruck
Tesla Cybertruckesakal

Tesla Cybertruck : हॉलिवूड अभिनेत्री आणि अमेरिकन इन्फ्लुएन्सर किम कार्देशीयनने नुकत्याच पार पडलेल्या मेट गालामध्ये अनोख्या लूकमध्ये हजेरी लावली होती. तिचा हा लूक चांगलाच गाजला होता. आता नुकतीच किम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण, म्हणजे किमचा धाकटा मुलगा psalm ला वाढदिवसानिमित्त भेट देण्यात आलेला टेस्लाचा सायबरट्रक.

psalm च्या वाढदिवसानिमित्त त्याची आजी क्रिस जेनरने त्याला ही टेस्ला सायबर ट्रकची छोटीशी कार गिफ्ट केली आहे. किमच्या आवडीनिवडीशी जुळणारे हे गिफ्ट आजीने psalm ला देऊन त्याचा ५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या संदर्भातील स्टोरी तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिचा मुलगा हा नवीन टेस्ला सायबर ट्रक चालवताना दिसत आहे.

Tesla Cybertruck
Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

हा ट्रक चालवताना किम तिच्या मुलाला प्रेमाने म्हणते की, ‘तू आता आईसोबत मॅचिंग झाला आहेस’. कारण, किमची स्वत:ची ओरिजिनल कार ही लक्झरी टेस्ला सायबर ट्रक आहे. या लक्झरी कारची किंमत तब्बल ५० लाखांपासून सुरू होते, तर ८३ कोटींपर्यंत ही कार खरेदी केली जाऊ शकते. यामध्ये विविध व्हर्जन्सचा समावेश आहे.

हे गिफ्ट पाहून नेटकरी पुरतेच भारावून गेले आहेत. हा छोटासा सायबर ट्रक चालवताना psalm जाम खुश दिसत आहे. नेटकऱ्यांना हे गिफ्ट भलतेच आवडले असून त्यावर भरभरून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. तसेच, हा टेस्ला सायबर ट्रक नेमका काय प्रकार आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

टेस्ला सायबर ट्रक

किमच्या मुलाला गिफ्ट करण्यात आलेले हे टेस्ला सायबर ट्रकचे खेळणे एक इलेक्ट्रिक खेळणे आहे. जे पूर्णपणे खऱ्याखुऱ्या सायबरट्रक सारखे दिसते. या खेळण्याची किंमत तब्बल १ लाख २५ हजार २५० एवढी आहे. यामध्ये अ‍ॅडजस्टेबल सीट आणि रियर-व्हील ड्राईव्ह आहे. तसेत, इलेक्ट्रिक ब्रेकिंग, एलईडी लाईट्स आणि टेल लाईट्स देखील आहेत.

हे टेस्ला सायबर ट्रकचे खेळणे एक प्रकारे खऱ्याखुऱ्या टेस्ला सायबर ट्रकचे मिनी व्हर्जन आहे. जे खास लहान मुलांसाठी डिझाईन करण्यात आलेले एक इलेक्ट्रिक वाहन आहे. या वाहनामध्ये २ मुले आरामात बसतात. शिवाय, ६ ते १२ वयोगटातील मुलांसाठी हे एक उत्तम गिफ्ट आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून या सायबरट्रकची विक्री केली जाते.

Tesla Cybertruck
Tesla Layoff: इलॉन मस्कचा मोठा निर्णय! टेस्लातील 6 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com