अरे वाह! आता Play Storeच्या माध्यमातून दुसऱ्या फोनमध्ये पाठवा ॲप्स आणि फाईल्स; जाणून घ्या या भन्नाट फीचरबद्दल

टीम ई सकाळ 
Saturday, 20 February 2021

Google Play Storeचा उपयोग करून ॲप्स दुसऱ्या फोनमध्ये पाठवू शकणार आहात. इतकंच नव्हे तर फाईल्स आणि कॉन्टॅक्टसुद्धा दुसऱ्या फोनमध्ये पाठवणं अगदी सोपी होणार आहे. चला तर जाणून घेऊया या भन्नाट फीचरबद्दल.

नागपूर : Google म्हणजे आपल्या प्रत्येक समस्यांवर असणारं समाधान आहे. गुगलच्या माध्यमातून आपली अनेक कामं अगदी सोपी होतात. यूजर्सना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून गुगलसुद्धा तत्पर असते. म्हणूनच आता तुमच्या आमच्या कामाचं एक भन्नाट फिचर गुगल घेऊन आलंय. गुगलनं आता Nearby Sharing नावाचं फिचर आणलंय. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही खूप सोप्या पद्धतीनं Google Play Storeचा उपयोग करून ॲप्स दुसऱ्या फोनमध्ये पाठवू शकणार आहात. इतकंच नव्हे तर फाईल्स आणि कॉन्टॅक्टसुद्धा दुसऱ्या फोनमध्ये पाठवणं अगदी सोपी होणार आहे. चला तर जाणून घेऊया या भन्नाट फीचरबद्दल. 

अशा पद्धतीनं शेअर करा ॲप्स

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे नवीन फिचर वापरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Storeचं लेटेस्ट व्हर्जन असणं आवश्यक आहे. म्हणजेच व्हर्जन 24.0 किंवा त्यापेक्षा नवीन व्हर्जन असणं गरजेचं आहे. जर ते असेल तर सुरुवातीला Google Play Store ओपन करा. सर्वात वरती असलेल्या तीन रेषांवर क्लिक करा. यानंतर My apps & games या पर्यायावर क्लिक करा. जिथे तुम्हाला अनेक tabs दिसतील त्यापैकी Share या tabवर जा.  

नक्की वाचा - तुमच्या लहान मुलांना कुठल्याही वेबसाईटपासून दूर ठेवायचंय? मग असं करा ब्लॉक; जाणून घ्या 

या टॅबवर गेल्यावर तुम्हाला Send आणि Receive हे दोन पर्याय दिसतील. पण त्याआधी तुम्हाला तुमच्या फोनचा लोकेशन ॲक्सेस मागण्यात येईल. ज्यामुळे तुमच्या आजूबाजूला असलेलय फोनबद्दल तुमच्या फोनला माहिती मिळू शकेल.त्यानंतर ज्या फोनमध्ये फाईल्स पाहिजे आहेत त्या फोनमध्ये Receive हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. तसंच ज्या फोनमधून फाईल्स पाठवायच्या आहेत त्या फोनमध्ये Send हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल.

जर तुम्हाला ॲप्स आणि फाईल्स send करायच्या असतील तर तुमच्यासमोर एक लिस्ट येईल ज्यामधून तुम्हाला ज्या ॲप्स आणि फाईल्स पाठवायच्या आहेत ते सिलेक्ट करावं लागतील. मात्र यात फीचरच्या माध्यमातून तुम्ही सर्वच ॲप्स पाठवू शकत नाही. मात्र एकापेक्षा अधिक ॲप्स आणि फाईल्स पाठवू शकता. 

हेही वाचा - क्या बात है! आता स्मार्टफोनद्वारे चेक करा तुमचा हार्ट रेट; Google Pixel लवकरच आणणार फिचर 

कसे कनेक्ट होतील फोन्स 

२ फोन्सना आपसांत कनेक्ट करण्यासाठी एक पेअरिंग कोड येईल. या कोडच्या माध्यमातूनच हे स्मार्टफोन्स कनेक्ट होऊ शकतील. जेव्हा संपूर्ण ॲप्स आणि फाईल्स दुसऱ्या फोनमध्ये येतील त्यावेळी ॲप्ससाठी Install हा पर्याय उपलब्ध असेल. ॲप्स आणि फाईल्स पाठवून झाल्यात की तुम्हाला Disconnect वर क्लिक करून बाहेर पडता येईल. अशा पद्धतीनं तुम्ही Google Play Storeच्या माध्यमातून ॲप्स आणि फाईल्स पाठवू शकणार आहात. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know about new Nearby sharing feature of Google