Digi Yatra: विमानतळावरच्या वेटिंगने चिडचिड होते? सरकारचं App ठरणार तारणहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Digi Yatra

Digi Yatra: विमानतळावरच्या वेटिंगने चिडचिड होते? सरकारचं App ठरणार तारणहार

Digi Yatra details: देशांतर्गत फिरायचे असेल अथवा बाहेरच्या देशात जायचे असेल तर विमानाने प्रवास करण्यास अनेकजण प्राधान्य देतात. गेल्याकाही दिवसात विमानतळावर प्रचंड गर्दी होत असल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. विमानतळावर होणारी ही गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. याचाच भाग म्हणून काही दिवसांपूर्वी नवीन बोर्डिंग सेवा सुरू करण्यात आली आहे.

आता प्रवाशांचा चेहराच पासपोर्टचे काम करणार आहे. गेल्या महिन्यात नागरी उड्डाण मंत्रालयाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर Digi Yatra सेवा सुरू केली आहे. सध्या ही सेवा दिल्ली, बंगळुरू आणि वाराणसी या विमानतळावर सुरू झाली आहे. तर मार्च २०२३ पर्यंत हैद्राबाद, पुणे, विजयवाडा आणि कोलकत्ता विमानतळावर देखील ही सेवा सुरू होईल.

हेही वाचा: ChatGPT: Google चे धाबे दणाणार, टक्कर देण्यासाठी Microsoft-ChatGPT ने तयार केला खास प्लॅन

डिजी यात्रा नक्की काय आहे?

डिजी यात्रांतर्गत फेशियल रिकॉग्निशनद्वारे प्रवाशांची ओळख केली जाईल. एअरपोर्टवर बोर्डिंग पासची गरज नसेल. ही पूर्णव्यवस्था पेपरलेस असेल. ही सेवा सेंट्रलाइज्ड मोबाइल वॉलेटवर आधारित आयडेंटिटी प्लॅटफॉर्मवर काम करेल. याद्वारे विमानतळावर एंट्री करताना, सुरक्षा तपासणी या सर्व गोष्टींसाठी केवळ चेहरा दाखवावा लागेल.

हेही वाचा: 5G Smartphone: चीनी कंपन्यांना टक्कर देणार 'हा' भारतीय ब्रँड, आणणार स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन

कसे काम करेल डिजी यात्रा?

डिजी यात्रीच्या मदतीने विमानतळावर सहज प्रवेश मिळेल. यासाठी सर्वात प्रथम विमानतळाच्या ई-गेटवर तुमचा बार कोड स्कॅन करावा लागेल. यानंतर फेशियल रिकॉग्निशनच्या मदतीने तुमची ओळख पटेल. तुमच्या चेहरा व कागदपत्रांना व्हेरिफाय केले जाईल. फेस व्हेरिफिकेशननंतर तुम्ही सहज विमानतळ आणि सिक्योरिटी चेक पार करू शकाल. यासाठी तुम्हाला डिजी यात्रा अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.

डिजी यात्रा अ‍ॅपमध्ये तुम्हाला तुमची माहिती द्यावी लागेल. तुमच्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीला तपासले जाईल. त्यानंतर ओटीपीच्या माध्यमातून लॉग इन करा. विमानतळावर वेब चेक करताना या अ‍ॅप वर तिकीट डाउनलोड होईल.

अ‍ॅप किती सुरक्षित

डिजी यात्रा अ‍ॅपच्या मदतीने चेक इन प्रक्रिया सोपी होईल. चेक इनसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. तसेच, या अ‍ॅपबाबत स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रवाशांची माहिती पूर्णपणे सुरक्षित असेल. विशेष म्हणजे प्रवाशांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ब्लॉकचेन टेक्नोलॉजीचा वापर केला जाईल. विमानतळावर स्कॅन केल्यानंतर २४ तासांनी प्रवाशांची माहिती हटवली जाईल.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

टॅग्स :TechnologyAirport