डेबिट कार्डने भरा तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल, ही आहे सोपी प्रोसेस

credit Card
credit Cardesakal
Updated on

बँकिंग अ‍ॅप्स आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या अ‍ॅप्स व्यतिरिक्त सध्या बाजारात CRED, Paytm, Mobikwik, Phonepe, Amazon सारखे अनेक थर्ड पार्टी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन देखील सध्या उपलब्घ झाले आहेत, जे वापरुन तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सहज करु शकता. सहसा क्रेडिट कार्ड बिल भरताना तुम्हाला नेटबँकिंग किंवा यूपीआय सारख्या पेमेंट मोडचा ऑप्शन दिला असतो. आज आपण डेबिट कार्ड वापरुन क्रेडिट कार्ड बिल कसे भरता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत.

क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करताना तुम्हाला पेटीएम, मोबिक्विक आणि क्रेड सारख्या अ‍ॅप्समध्ये पेमेंट मोड म्हणून डेबिट कार्डचा ऑप्शन मिळतो.

पेटीएम अ‍ॅपवर अशाप्रकारे क्रेडिट कार्ड बिल भरा

  1. सर्वप्रथम Paytm अ‍ॅप अपडेट करा.

  2. आता पेटीएम अ‍ॅप उघडा आणि All Service वर क्लिक करा.

  3. त्यानंतर Monthly Bills वर क्लिक करा, त्यानंतर डावीकडे Recharge आणि Pay Bills वर क्लिक करा तुम्हाला Pay Credit Card Bill ऑप्शन दिसेल. होम पेजवर रिचार्ज आणि बिल पेमेंट सेक्सनमघ्ये पे क्रेडिट कार्ड बिलचा पर्याय दिसेल. अॅपमध्ये सर्च केल्यानंतरही पे क्रेडिट कार्ड बिलचा पर्याय येतो.

  4. जर तुम्ही पहिल्यांदा कार्ड पेमेंट करत असाल तर Add Credit Card वर क्लिक करा. त्यानंतर कार्ड नंबर टाका आणि Proceed वर क्लिक करा. तुमचे क्रेडिट कार्ड आधीच सेव्ह केले असल्यास त्यावर क्लिक करा.

  5. आता रक्कम एंटर करा आणि Proceed वर क्लिक करा.

  6. पेमेंट मोड निवडा. यानंतर UPI, नेटबँकिंग, पेटीएम पेमेंट बँक आणि पेटीएम वॉलेट याऐवजी डेबिट कार्ड निवडा आणि पमेंट पुर्ण करा.

Mobikwik अ‍ॅपवर क्रेडिट कार्ड बिल कसे भरावे

  1. मोबिक्विक अ‍ॅप उघडा आणि Recharge & Pay Bills वर क्लिक करा.

  2. यानंतर तुम्हाला Credit Card चा पर्याय दिसेल.

  3. जर तुम्ही पहिल्यांदा कार्ड पेमेंट करत असाल तर Pay Bill For Other Credit Card वर क्लिक करा. त्यानंतर कार्ड नंबर टाकून रक्कम एंटर करा.

  4. यानंतर आता पेमेंट मोड निवडा. यानंतर, Mobikwik वॉलेट बॅलेंस आणि यूपीआय व्यतिरिक्त, आपण डेबिट कार्डद्वारे पेमेंट करू शकता.

CRED App

यामध्ये क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करताना (1 लाख रुपयांपर्यंत) नेटबँकिंग आणि यूपीआयचा ऑप्शन दिलेला असतो. मात्र नेटबँकिंग आणि यूपीआय व्यतिरिक्त, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करताना पेमेंट मोड म्हणून डेबिट कार्डचा पर्याय देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com