esakal | आधार कार्ड आता स्वतःलाच करता येईल अपडेट, ही आहे सोपी प्रोसेस | Aadhaar Card Update
sakal

बोलून बातमी शोधा

 Aadhaar Card Update

आधार कार्ड आता स्वतःलाच करता येईल अपडेट, ही आहे सोपी प्रोसेस

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Aadhaar Card Update : सध्या कुठल्याही सरकारी कामासाठी आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे कागदपत्र बनले आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यासोबत बँक खाते उघडणे किंवा नवीन सिम मिळवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे, जर ते नसेल तर तुम्हाला या सेवा मिळणार नाहीत. अशा परिस्थितीत तुमच्याकडे आधार कार्ड असणे आणि त्यातील सर्व माहिती बरोबर असणे महत्वाचे ठरते.

दरम्यान पहिल्यांदा आधार कार्ड नोंदणी करतेवेळी जर तुमच्या आधार कार्डवरील माहितीमध्ये काही चूक झाली असेल, जसे की तुमचे नाव, लिंग किंवा जन्मतारीखेत चूक झाली असेल तर आता तुम्ही ही माहिती स्वतःच अपडेट करू शकता. UIDAI ने आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी सेल्फ-सर्व्हिस अपडेट पोर्टल सुरु केले आहे, आज आपण या पोर्टलर आधारकार्ड सेल्फ अपडेट करण्याची पध्दत जाणून घेणार आहोत.

यूआयडीएआय (Unique Identification Authority of India)ने दिलेल्या माहितीनुसार, आधार वापरकर्ते त्यांच्या आधार कार्डवर त्यांचे लिंग बदलू शकतात. यासाठी वापरकर्त्यांना आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (https://ssup.uidai.gov.in/ssup/) वापरावे लागेल. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की वापरकर्ते फक्त एकदाच त्यांचे लिंग अपडेट करु शकतात.

लिंग (Gender) कसे अपडेट करावे?

तुमच्या आधार कार्डावर तुमचे लिंग (Gender) अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार मध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबरची आवशकता लागेल. आधार कार्डमध्ये तुमचे लिंग अपडेट करण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही.

हेही वाचा: MG Astor भारतात लाँच, किंमत Hyundai Creta पेक्षा कमी

नाव आणि पत्ताही अपडेट करता येतो

लिंगाव्यतिरिक्त, तुम्ही UIDAI च्या सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर तुमच्या आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख आणि पत्ता अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची कलर स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. UIDAI च्या माहितीनुसार, तुम्ही तुमचे नाव दोनदा, लिंग एकदा आणि जन्मतारीख तुमच्या आयुष्यात एकदाच बदलू शकता. यासंबंधी अधिक माहितीसाठी, वापरकर्ते uidai.gov.in वर UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

शुल्क काय असेल

ऑनलाइन पोर्टलद्वारे आधार कार्डमधील प्रत्येक अपडेटसाठी तुमच्याकडून 50 रुपये आकारले जातात. सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर तुमचे लिंग अपडेट करण्यासाठी तुम्हाला मोबाईल ओटीपीची कन्फर्म करावा लागेल.

हेही वाचा: वर्षानुवर्षे कार नवीन ठेवायचीय? मग या सोप्या टिप्स करा फॉलो

loading image
go to top