एअरटेल वापरकर्ते नेटवर्क नसतानाही करु शकतात व्हॉईस कॉलिंग, हा आहे सोपा मार्ग

Know how to activate airtel wifi calling feature on android  and ios smartphones Marathi article
Know how to activate airtel wifi calling feature on android and ios smartphones Marathi article

पुणे : सध्याच्या धावपळीच्या जगात मोबाईल फोन ही अत्यंत गरजेची वस्तू झाली आहे. दैनंदीन जीवनात फोनखेरीज आपले कसलेही काम आजकाल होत नाही.  त्यातच जर तुमच्या फोनला नेटवर्क येत नसेल तर असंख्य कामे अडकून पडू शकतात.  देशातील बऱ्याच दिग्गज टेलिकॉम कंपन्या चांगले नेटवर्क कनेक्शन देत असल्याचा दावा करताना दिसतात.

बर्‍याचदा अशी परिस्थिती असते की आपल्या फोनमध्ये नेटवर्कच नसते. तसेच, बरीच ठिकाणे आहेत जिथे नेटवर्क समस्या आहे. अशाच परिस्थितीत एअरटेल आपल्या ग्राहकांना वाय-फाय कॉलिंगची सुविधा देत आहे. या फिचरच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या नंबरवरून वायफाय नेटवर्कद्वारे व्हॉईस कॉलिंग करु शकणार आहेत. 

तुमचा फोन सपोर्ट करतो का?

आपल्या फोनमध्ये एअरटेलची वायफाय कॉलिंग वापरण्यापूर्वी, आपला फोन या फिचरला सपोर्ट देतो की नाही हे पाहावे लागेल त्यासाठी , या लिंकवर जा ( https://www.airtel.in/wifi-calling ) आणि आपली फोन कंपनी निवडा. जर तुमचा फोन सूचीमध्ये असेल तर आपण वायफाय कॉलिंगचा देखील लाभ घेऊ शकता. 

 Android वापरकर्त्यांसाठी

आपला स्मार्टफोन अनलॉक करा आणि त्यामध्येय सेटिंग्जवर जा. 
आता सिम कार्ड आणि मोबाइल नेटवर्क पर्याय उघडा. 
आता सिम कार्ड सेटिंग्ज वर जा आणि एअरटेल सिम निवडा. 
येथे आपल्याला वाय-फाय कॉल करण्याचा पर्याय दिसेल. ते सुरु करा. 
आता आपण नेटवर्कशिवाय एअरटेल नंबरवरुन कॉल करु शकाल. 

आयफोन वापरकर्त्यांसाठी

आयफोनमध्ये एअरटेल वायफाय कॉलिंग हे फिचर वापरणे अधिक सोपे आहे. 
त्यासाठी आपला आयफोन अनलॉक करा आणि सेटिंग्ज वर जा. 
मोबाइल डेटा पर्यायावर जा आणि एअरटेल सिम निवडा. 
येथे आपणास वाय-फाय कॉलिंगचा पर्याय मिळेल, जो चालू करावा लागेल.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com